मुंबई : दिवसभर काम आणि प्रवास करून  घरी  थकून भाकून परतणारे अनेकजण थेट बेडवर पडतात. रात्रीच्या जेवणापूर्वी थोडा आराम करणं हे रिफ्रेशिंग असलं तरीही जर तुम्ही थेट पोटावर झोपत असाल तर या स्थितीमुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.  पोटावर झोपण्याची सवय शरीरात काही गंभीर समस्या निर्माण करण्याची शक्यता असते हे तुम्हांला ठाऊक आहे का ? पहा पोटावर झोपण्याची तुमची सवय कशी ठरू शकते त्रासदायक?  


 पोटावर झोपण्याच्या सवयीचे दुष्परिणाम 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 
 पोटावर झोपण्याच्या सवयीमुळे पाठीवर परिणाम होतो. सोबतच पाठदुखी, मानेचे दुखणे, सांध्याचे दुखणे वाढू शकते. अशा दुखण्याचा परिणाम तुमच्या झोपेवरही होतो परिणामी दिवसभर तुम्हांला थकवा जाणवतो.   


 मणक्यावर ताण  


 पोटावर झोपण्याच्या सवयीमुळे पाठीच्या मणक्यावर ताण येऊ शकतो. यामुळे संपूर्ण शरीरात वेदना जाणवतात.  शरीराचे अनेक भाग सुन्न झाल्यासारखे वाटते. 


 मानेचे दुखणे 


 पोटावर झोपण्याच्या सवयीमुळे डोकं आणि मणक्यामध्ये अंतर निर्माण होते. परिणामी मानेचे दुखणे बळावू शकते. यामधूनच हर्नियेटेड डिस्क हा आजार वाढू शकतो. यामध्ये मणक्यामध्ये त्रास जाणवू शकतो. संपूर्ण मज्जासंस्थेतही वेदना जाणवतात.  


 सल्ला  


पोटावर झोपणं त्रासदायक ठरू शकते. मग नेमक्या कोणत्या स्थितीत झोपणं आरोग्याला फायदेशीर आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे. डाव्या कुशीवर झोपणं आरोग्याला फायदेशीर ठरते. त्यामुळे झोपताना चूकीच्या स्थिती  टाळा.