मुंबई : उन्हाळ्याच्या दिवसांत गरम पाण्याने अंघोळ करणं नुकसानकारक ठरु शकतं. उन्हाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करण्याने अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. यापैकीचं एक म्हणजे केसांची समस्या. उन्हाळ्यात केसांसाठी गरम पाण्याचा वापर केल्याने केसात कोंडा (डॅन्ड्रफ) होऊन केस गळण्याची समस्या सुरु होते. उन्हाळ्याच्या दिवसांत सूर्याची अल्ट्रा वायलेट किरणं मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे उष्णता आणि धुळीमुळे केसांना नुकसान होतं. या नुकसानीपासून बचाव होण्यासाठी काही घरगुती उपायांनी केसांचं, शरीराचं आरोग्य उत्तम राखता येतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केस अधिक डिहायड्रेट किंवा रखरखीत झाल्यास केसांना दररोज काही वेळ नारळ्याच्या किंवा मोहरीच्या तेलाने मसाज करा. तेलाने केलेला मसाज केसांसाठी सर्वोत्तम मानला जातो. यादरम्यान धूळ किंवा उन्हात जाण्याचे टाळा. उन्हाळ्याच्या दिवसांत केसांची काळजी न घेतल्यास केस रुक्ष होतात. केसांचा रुक्षपणा कमी करण्यासाठी गरम पाण्याने अंघोळ करु नका. त्याऐवजी थंड पाणीचा वापर करा. केसांना फाटे फुटले असल्यास केस काही काळानंतर ट्रीम करत राहा. केस गळणे आणि केसांत सतत कोंडा होत असल्यास गरम पाण्याचा वापर करु नका. केस धुण्याआधी १५ मिनिटे मसाज करणे अत्यावश्यक आहे. मोठ्आ प्रमाणात केस गळत असल्यास हेल्दी डाएट करणे गरजेचं आहे. खाण्यामध्ये सर्वाधिक लिक्विड आणि हिरव्या भाज्यांचा वापर करा. केस धुण्यासाठी केमिकलयुक्त शॅम्पुचा वापर करु नका. त्याजागी आयुर्वेदिक शॅम्पुचा वापर करा. केस चांगले, स्वच्छ राहिल्यास कमी गळतात. गरम पाण्यापेक्षा थंड पाण्याने अंघोळ केल्यास केसांची मूळ मजबूत होतात. 


गरम पाण्यापेक्षा थंड पाण्याने अंघोळ केल्यास रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते. थंड पाण्याने अंघोळ केल्यास वजन कमी करण्यास मदत होते. थंड पाण्याने त्वचा चमकदार होते. उन्हाळ्यात गरम पाण्याने अंघोळ केल्यास त्वचा कोरडी पडते त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. थंड पाण्याने त्वचा कोरडी पडत नाही, रुक्ष होत नाही. जास्त गरम पाण्याने अंघोळ केल्यास त्वचेवर सुरकुत्या पडण्याचा धोका असतो. थंड पाण्याने अंघोळ केल्याने तणाव कमी होतो. उत्साह वाढतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या उष्ण दिवसांत अति गरम किंवा गरम पाण्याने अंघोळ करणं टाळा. थंड पाण्याचा वापर करा अणि दिवसभर उत्साही राहा.