पावसाळ्यात `या` 5 आयुर्वेदिक गोष्टींचा आहारात करा समावेश, अनेक आजार राहतील दूर
Monsoon Health Tips: पावसाळ्यात तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर काही आयुर्वेदिक पदार्थांचा आहारात समावेश केला पाहिजे. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते आणि तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता.
Monsoon Diet Tips in Marathi: आता पावसाळा चांगला सुरु झाला आहे. सर्दी, खोकला, ताप यांचे रुग्ण वाढत आहेत. तसेच पावसाळ्यात अनेक प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागते. या हंगामात डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया आदी आजारांनी लोक हैराण होतात. याशिवाय पावसाळ्याच्या दिवसात त्वचा आणि केसांच्या समस्या उद्भवतात, परंतु तुम्ही तुमच्या आहारात काही आयुर्वेदिक गोष्टींचा समावेश केला तर हे आजार कोसो दूर राहतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या डाएडमध्ये यांचा समावेश केला पाहिजे.
मान्सून चांगलाच सक्रीय झाला आहे. जून महिन्याच्या अखेरीस पाऊस सुरु झाला आणि तो चांगलाच बरसत आहे. पावसाळ्याच्या या ऋतूत लोक विविध प्रकारच्या स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेतात. मात्र, हा ऋतू आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेतली नाही तर तो त्रासदायक ठरतो. पावसाळ्यात तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर काही आयुर्वेदिक पदार्थांचा आहारात समावेश केला पाहिजे. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते आणि तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता. पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी कोणत्या गोष्टींचा आहारात समावेश करावा, ते जाणून घ्या.
यांचा तुमच्या आहारात समावेश करा...
आले
व्हिटॅमिन-सी, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, अँटीवायरल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आल्यामध्ये आढळतात. पावसाळ्यात तुमच्या आहारात आल्याचा समावेश जरुर करावा. तुम्ही आल्याचा चहा, सूप किंवा भाज्यांमध्ये घालू शकता.
अश्वगंधा
अश्वगंधा, ज्याला 'विथानिया सोम्नीफेरा' म्हणूनही ओळखले जाते. यात रोगप्रतिकारक-मॉड्युलेटिंग गुण आहे. जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करु शकतात. पावसाळ्याच्या आहारात अश्वगंधा अवश्य समाविष्ट करा. ही आयुर्वेदिक औषधी वनस्पती मन शांत करण्यास, जळजळ कमी करण्यास आणि रक्तदाब कमी करण्यास मदत करते.
कडूलिंब
कडुलिंबाची चव कडू असली तरी. त्यात सूक्ष्मजीव गुणधर्म आढळतात. जे पावसाळ्यात त्वचेची काळजी घेण्यास मदत करतात. कडुनिंबाच्या पानांमध्ये बुरशीविरोधी गुणधर्म आढळतात. तुम्ही कडुलिंबाचा चहा देखील बनवू शकता किंवा कडुलिंबाची पाने चावू शकता. यामुळे तुम्ही निरोगी राहाल.
गवती चहा
लेमनग्रासमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. आपण ते चहाच्या माध्यमातून घेऊ शकता. यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढते. लेमनग्रास पावसाळ्यात होणाऱ्या सामान्य आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करु शकते.
गुळवेल
गुळवेल हिला अमृतवेल म्हणतात. गुळवेलला हिंदी भाषेत गिलोय म्हणूनही ओळखले जाते. या वनस्पतीचे सत्त्व औषध म्हणून वापरतात. जर तुम्हाला पावसाळ्यात संसर्ग टाळायचा असेल तर तुम्ही गुळवेलचीचा रस पिऊ शकता किंवा त्याची पावडर वापरु शकता. जे संसर्गाशी लढण्यास मदत करते. या आयुर्वेदिक औषधांमध्ये ताप कमी करणारे गुणधर्म आहेत.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)