नवी दिल्ली : ग्रामीण भागात अजूनही बरेच लोक कोळसा किंवा रॉकेलचा स्टो अथवा इतर घरगुती स्त्रोत म्हणजे चुलीचा वापर करतात. भारतातील साधारपणे ७०% लोक यातून निघणाऱ्या धुराच्या संपर्कात येतात. त्या धुरमिश्रित हवेत श्वास घेतात. या धुरात कार्बनचे कण, कार्बन मोनोऑक्साईड,  नाइट्रस ऑक्साइड, सल्फर ऑक्साइड, फॉर्मलडीहाइड आणि कॅन्सरजन्य घटकांची निर्मिती होते. एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, हा धूर अस्थमाचे मुख्य कारण आहे आणि मुलांमध्ये हा आजार फोफावत चालला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


वर्ड हेल्थ ऑर्गनाजेशन (डब्ल्यूएचओ) च्या अहवालानुसार भारतात १.५ करोडमध्ये २ करोड लोकांना दमा म्हणजे अस्थमा आहे. आणि ही संख्या कमी होईल असे कोणतेही चिन्ह दिसत नाही. अभ्यासातून असेही दिसून आले आहे की, मुलांमध्ये अस्थमाचा प्रसार अधिक प्रमाणात होत आहे. कारण त्याची श्वसननलिका लहान असून हवेतील प्रदूषित घटकांमुळे ती संकुचित होते.


 


इंडियन मेडीकल असोशिएशन (आईएमए) चे अध्यक्ष डॉ. के. के. अग्रवाल यांनी सांगितले की, अस्थमा हा श्वसन विकार आहे. यामध्ये फुफ्फुसांना ऑक्सिजनचा पुरवठा करणारा ब्रॉन्कियल पॅसेज कमी होतो. अस्थमाची दोन कारणे असू शकतात. एक म्हणजे श्वसनमार्गात कफ जमा झाल्याने फुफ्फुसांना सूज येणे आणि दुसरा म्हणजे श्वानमार्ग आकुंचन झाल्याने येणारी सूज.


 


डॉ. अग्रवाल यांनी सांगितले की, अस्थमाची सुरुवात खोकल्यापासून होते. सुरुवातीला त्याकडे गंभीरपणे पहिले जात नाही. कफ सिरप घेऊन खोकला बरं करण्याचा प्रयत्न केला जातो. लहान मुलांना अस्थमा झाल्याचे निदान करणे कठीण आहे. कारण त्यांच्यामधे श्वास घेताना त्रास होणे, खोकला, घाबरणे आणि छाती जड होणे, अशा लक्षणे दिसून येत नाहीत. याउलट प्रत्येक मुलामध्ये याचे संकेत वेगळे दिसून येतात.


 


त्याचबरोबर डॉक्टर म्हणाले की, काही गोष्टींमुळे अस्थमाचे स्वरूप गंभीर होते. एखाद्या मुलाला अस्थमाचे निदान झाल्यास अशा काही गोष्टी त्याच्यापासून दूर ठेवणे योग्य ठरेल.  


 


डॉ. अग्रवाल यांनी सांगितले की, अस्थमाचा आरोग्यावर काय आणि कसा परिणाम होईल, याकडे तरुणाई फार गंभीरतेने बघत नाही. म्हणून त्याबद्दल योग्य माहिती असणे गरजेचे आहे. लहान मुलांना आपत्कालीन परिस्थितीत इतरांची मदत मागण्यास सांगणे गरजेचे आहे.


 


लहान मुलांमध्ये अस्थमा आणि त्याची लक्षणे यांना आळा घालण्यासाठी काही टीप्स:


  • नियमित औषधे द्या.

  • नियमित तपासण्या करा.

  • डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे द्या.

  • अस्थमाचा त्रास वाढवणाऱ्या गोष्टींपासून दूर राहण्यासाठी उपाययोजना करा.

  • इन्हेलर नेहमी सोबत ठेवा आणि गरज असल्यास न लाजता त्याचा वापर करण्यासाठी मुलांना प्रोत्साहन द्या.

  • अस्थमासोबत इतर कोणता त्रास असल्यास डॉक्टरांना त्याबद्दल माहिती द्या.

  • ताण कमी करून शांत आणि आनंदी जीवन जगण्यासाठी मुलांची मदत करा.