मुंबई : फीट आणि फाईन राहण्यासाठी तुमच्या शरीरातील कोलस्ट्रॉल नियंत्रणात असणं गरजेचं आहे. शरीरात जर कोलेस्ट्रॉल वाढलेलं असेल तर हृदयाच्या आजारांचा धोका वाढतो. मात्र आता अनेकांच्या मनात प्रश्न असा आहे की, कोलेस्ट्रॉल कसं नियंत्रणात ठेवावं. यासाठी तुम्हाला कोलेस्ट्रॉल का वाढतं याची कारणं सांगणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुमच्या दररोजच्या जीवनात तुम्ही अशा काही चुका करत असता, ज्यामुळे तुमचं कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते. या चुका नेमक्या काय आहेत, त्या आज आपण जाणून घेऊया. 


फायबर कमी घेणं


फायबर हे तुमच्या शरीरासाठी खूप महत्वाचं असतं. शरीरात फायबरच्या कमतरतेमुळे अनेक आजार होऊ शकतात. जर तुमच्या शरीराला कमी प्रमाणात फायबर मिळालं तर कोलेस्ट्रॉल देखील वाढू शकते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात फायबरचा पुरेसा समावेश केला पाहिजे. 


पॅक्ड बंद पदार्थ खाणं


सध्या धावपळीच्या जीवनात आपण पॅकेटमध्ये बंद असलेले पदार्थ जास्त प्रमाणात खातो. यामध्ये सकाळच्या नाश्त्याला देखील आपण असंच जंक फूज खातो. मात्र या पद्धतीच्या खाण्याने तुमच्या शरीराचं नुकसान होतंय. या पदार्थांमुळे कोलेस्टेरॉलही वाढू शकतं. पॅकबंद खाद्यपदार्थांमध्ये कॅलरीज जास्त असतात, ज्यामुळे वजनातही वाढ होते.


डेयरी प्रोडक्ट्सचं अधिक सेवन


दुग्धजन्य पदार्थ आरोग्यासाठी आवश्यक आहेत. ते शरीराला पुरेसं कॅल्शियम आणि प्रोटीन मिळवून देण्यास मदत करतात. मात्र उच्च कोलेस्ट्रॉल असलेल्या लोकांनी दुग्धजन्य पदार्थांचं सेवन टाळलं पाहिजे.