मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या देशातील लाखो लोकांचा बळी घेतला. इतकंच नाही तर अनेक लोकांना रुग्णालयातही दाखल व्हावं लागलं. दरम्यान तज्ञांच्या मते, भारतातील कोरोना आता समाप्तीच्या दिशेने वाटचाल करतोय. सध्याची परिस्थिती पाहता, कोविड -19ची तिसरी लाट येण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण आता SARS-CoV-2 विषाणूचे फक्त डेल्टा आणि त्याचं व्हेरिएंट पसरत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉ. टी. जेकब जॉन, सेवानिवृत्त प्राध्यापक आणि क्लिनिकल व्हायरलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी विभागाचे प्रमुख, ख्रिश्चन मेडिकल कॉलेज (वेल्लोर) म्हणतात, “आपण सध्याच्या तिसऱ्या लाटेचा अधिक विचार करू नये. तिसरी लाट आली तरी ती पुढच्या वर्षाच्या मध्य किंवा शेवटी येईल."


महाराष्ट्र सरकारच्या कोविड टास्क फोर्समध्ये समाविष्ट असलेले डॉ. शशांक जोशी म्हणतात, "तिसरी लाट कधी येईल हे कोणीही सांगू शकत नाही. जर कोरोनाचा नवा व्हेरिएंट आला तर तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही."


डॉ. जॉन म्हणाले की, "जर आपण साप्ताहिक कोविड प्रकरणांची सरासरी बघितली तर ती गेल्या 16 आठवड्यांपासून सतत 50 हजाराच्या खाली राहिली आहे. एवढंच नाही तर 9 ऑक्टोबरपासून सतत 20 हजारांपेक्षा कमी नवीन संक्रमण नोंदवली जात आहेत."


डॉ जॉन म्हणतात, "भारतातील लसीकरण मोहीम विकसित देशांच्या तुलनेत चांगलं नाही. आम्ही असं म्हणू शकतो की, आपण एंडेमिक पातळीवर पोहोचलो आहोत. परंतु याचं कारण लसीकरण नाही, तर नॅच्युरल संक्रमण आहे. एंडेमिक टप्प्यावर पोहोचण्याचा अर्थ असा नाही की कोविड संपला आहे. आपण दीर्घ काळासाठी या एंडेमिक अवस्थेत आहोत."


डॉ.जोशी म्हणाले, "अशी अनेक ठिकाणं आहेत, जिथे गेल्या अनेक महिन्यांपासून दररोज 300-500 नवीन प्रकरणं समोर येतायत. त्या ठिकाणी लसीकरण  केलं गेलंय. याचा अर्थ असा की क्षेत्र कोविडच्या समाप्तीच्या दिशेने जात आहे."