मुंबई : वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने कोरोना मृत्यूबाबत जारी केलेल्या अहवालावरून शंका उपस्थित करण्यात येतेय. यामध्ये एक आक्षेप खुद्द भारतानेच नोंदवला आहे. डब्ल्यूएचओने जाहीर केलेल्या आकडेवारीवर, विश्वास ठेवता येणार नाही, असं स्पष्ट करण्यात आलंय. यावरून आता एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनीही याबाबत इशारा दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉ. गुलेरिया यांनी तीन मोठी कारणं दिली आहेत, ज्यामुळे WHO अहवालावर विश्वास ठेवता येत नाही. त्यांचं म्हणणं आहे की, भारतात जन्म-मृत्यू डेटा रेकॉर्ड करण्याचा एक पद्धतशीर मार्ग आहे, ज्यामध्ये कोविड वगळता सर्व प्रकारचे मृत्यू रेकॉर्ड केले जातात. तर हा डेटा जागतिक आरोग्य संघटनेने वापरलेला नाहीये. 


दुस-या कारणाबाबत डॉ गुलेरिया म्हणाले की, WHO ने गोळा केलेला डेटा विश्वासार्ह नाही. हा जमा केलेला डेटा कुठून आणलाय याची कल्पना नाही. हा डेटा मीडिया रिपोर्ट्समधून किंवा इतर कोणत्याही स्त्रोतांकडून गोळा केला गेला आहे जो योग्य नाही. जागतिक आरोग्य संघटनेने तेथून डेटा घेतला ज्यावर विश्वास ठेवता येत नाही.


या दोन कारणांनंतर डॉ. गुलेरिया यांनी कोरोनाच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांना दिलेल्या नुकसानभरपाईचा मुद्दाही उपस्थित केलाय. जर इतक्या लोकांचा मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबीयांनी सरकारकडे आर्थिक मदत मागितली असती. या संदर्भात ते म्हणाले की, भारताने कोरोनामुळे जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना भरपाईची तरतूद केली आहे. त्यामुळे यावर विश्वास ठेवता येत नाही.


यापूर्वी, नीती आयोगाचे सदस्य व्हीके पॉल यांनीही डब्ल्यूएचओचे आकडे अयोग्य असल्याचं सांगितलं आहे. ते म्हणाले, जेव्हा भारतात आधीच कोरोनामुळे मृत्यूची आकडेवारी आहे, अशा परिस्थितीत मॉडेलकडे लक्ष दिलं जाऊ शकत नाही जेथे केवळ अंदाजे आकडेवारी जाहीर केली गेलीये.