Smoked Biscuit म्हणजे काय? का निघतो यातून धुर... ज्यामुळे मुलाची तब्येत बिघडली?
Smoked Biscuit: लहान मुलांमध्ये सध्या स्मोक्ड बिस्किटाची क्रेझ प्रचंड वाढली आहे. पण या स्मोक्ड बिस्किटामुळे एका लहान मुलाची तब्येत बिघडल्याचा दावा केला जात होता. जाणून घेऊया स्मोक्ड बिस्किट म्हणजे नक्की काय?
Smoked Biscuits : बिक्सिट हा जवळपास सर्वांच्याच आवडीचा खाद्यपदार्थ. चहा बिस्किट म्हणजे लहान मुलांसपासून वृद्धांपर्यंत सर्वांच्याच आवडता नाश्ता. जगात बिस्किटचे (Biscuit) अनेक प्रकार आहेत. चॉकलेट बिस्किट, वॅनिला बिस्किट, क्रिम बिस्किट, साधी बिस्किटं असे अनेक फ्लेवर यात उपलब्ध आहेत. बिस्किट बनवणाऱ्या अनेक कंपन्या भारतीय बाजारपेठेत आहेत. पण सध्या लहान मुलांमध्ये नायट्रोजन स्मोक्ड बिस्किटची प्रचंड क्रेझ पसरली आहे. काही दिवसांपूर्वी स्मोक्ड बिस्किट खाल्ल्याने एका लहान मुलाची तब्येत बिघडल्याची बातमी पसरली होती. यामुळ स्मोक्ड बिस्किट (Smoked Biscuit) म्हणजे नक्की काय हे जाणून घेऊया.
स्मोक्ड बिस्किट म्हणजे काय?
स्मोक्ड बिस्किट म्हणजे हे बिस्किट खाल्ल्यामुळे तोंडातून धुर निघतो. धुम्रपान केल्यानंतर जसा तोंडातून धुर निघतो त्याचप्रमाणे स्मोक्ड बिस्किट खाल्यावर तोंडातन धुर निघतो. सामान्य बिस्किटच्या तुलनेत हे बिस्किट महाग असतं. फायर पानप्रमाणेच स्मोक्ड बिस्किट असतं. जसं फायर पान खाल्लं जात त्याचप्रमाणे स्मोक्ड बिस्किट खाल्लं जातं. हे बिस्किट खाल्ल्यानंतर तोंडातून धुर निघत असल्याने याला स्मोक्ड बिस्किट म्हटलं जातं.
स्मोक्ड बिस्किट कसं बनतं?
स्मोक्ड बिस्किट बनवण्याची प्रक्रिया सामन्य बिस्किटाप्रमाणेच असते. पण या बिस्किटांना लिक्विड नायट्रोयनमध्ये बुडवलं जातं. लिक्विड नायट्रोजनमध्ये बुडल्यानंतर बिस्किट खाण्यासाठी दिलं जातं. वैज्ञानिक भाषेत द्रव नायट्रोजन हा रंगहीन आणि गंधहीन पदार्थ आहे. नायट्रोजन कमी तापमानात द्रव अवस्थेत आढळतो . वायूच्या अवस्थेचे द्रवरूपात रूपांतर झाल्यानंतर त्यातून सफेद धुर बाहेर पडतो. लिक्विड नायट्रोजन रासायनिक पदार्थांपैकी एक आहे जे सहजपणे साठवले जाऊ शकते आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेले जाऊ शकते.
स्मोक्ड बिस्किटमुळे मुलाची तब्येत बिघडली?
काहि दिवसांपूर्वी कर्नाटकमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात एक लहान मुलगा एका स्टॉलवर स्मोक्ड बिस्किट खातो. बिस्किट खाल्यानंतर मुलाच्या तोंडातून सफेद धुर येऊ लागतो. पण थोड्याचवेळात तो मुलगा ओरडत असल्याचं व्हिडिओत दिसतं. बिस्किट खाल्याने पोट दुखत असल्याची तक्रार तो आपल्या आई-वडिलांकडे करतो. आसपास उभे असलेली लोकंही त्या मुलाभोवती जमतात. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या मुलाचा मृत्यू झाल्याची चर्चा पसरवण्यात आली.
वास्तिवक ही केवळ अफवा आहे. स्मोक्ड बिस्किट खाल्यानंतर मुलाची तब्येत काहीशी बिघडली. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारानंतर त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.