नवी दिल्ली : भारतात लोकांची उंची वाढण्याऐवजी कमी होतेय का? नुकत्याच केलेल्या एका स्टडीतून असा दावा करण्यात आला आहे. या अभ्यासात म्हटल्याप्रमाणे, गेल्या 10 वर्षात भारतातील पुरुष आणि स्त्रियांची उंची 1.10 सेंटीमीटरने कमी झाल्याचं आढळलं आहे.


लोकांची सरासरी उंची कमी होतेय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1998 ते 2015 पर्यंत भारतातील प्रौढ उंचीचे कल: राष्ट्रीय कुटुंब आणि आरोग्य सर्वेक्षण' नावाच्या भारतीयांच्या उंचीविषयी अभ्यास झाला. अभ्यासात असं आढळून आलं की, 1998-99 या वर्षात भारतातील लोकांच्या उंचीमध्ये वाढ झाली आहे. त्यानंतर, प्रौढ पुरुष आणि महिलांची सरासरी उंची 2005-06 ते 2015-16 पर्यंत कमी होऊ लागली. उंचीतील सर्वात मोठी घट गरीब महिला आणि आदिवासी महिलांमध्ये दिसून आली.


पुरुषांच्या उंचीमध्ये अधिक घट


अहवालानुसार, अभ्यास करणाऱ्या संशोधकांनी देशातील प्रौढांच्या सरासरी उंचीच्या विविध उंचीच्या ट्रेंडचा अभ्यास केला. या संशोधनात असं आढळून आलं की, 15 ते 25 वयोगटातील महिला आणि पुरुषांची सरासरी उंची कमी होतेय. अभ्यासात असं आढळून आलंय, महिलांची सरासरी उंची सुमारे 0.42 सेमी कमी झाली आहे. त्याच वेळी, भारतीय पुरुषांची सरासरी उंची 1.10 सेंटीमीटरने कमी झाल्याचं आढळून आलं आहे.


उंची कमी होण्याचं कारण आलं समोर 


भारतीयांची उंची कमी होण्याचं कारण पुढे आल्यावर अनेक खळबळजनक गोष्टी समोर आल्या. असं दिसून आलं की, ज्या मुलांची आई किंवा वडील उंचीने लहान आहेत, मोठे झाल्यावर त्या मुलांची उंचीही कमी होत आहे. यासोबतच जीवनशैली, पोषण, सामाजिक आणि आर्थिक घटकंही समोर आले.


सर्वेक्षणात असंही दिसून आलंय की, उंची कमी होण्याच्या सुमारे 60-80 टक्के अनुवांशिक समस्या जबाबदार आहेत. त्याच वेळी, सुमारे 20-40 टक्के कारणं इतर आहेत.


समोर आलेल्या अहवालातून शास्त्रज्ञ हैराण


भारतातील लोकांची सरासरी उंची कमी होण्याच्या घटनेमुळे संशोधक आश्चर्यचकित झाले आहेत. याचं कारण असे की, जगाच्या विविध भागांतील आधीच्या अभ्यासांमध्ये हे उघड झालंय की इथल्या लोकांची उंची वाढत आहे. अशा परिस्थितीत भारतीयांची उंची कमी होणं ही बाब धोक्याचं लक्षण मानलं जातंय. 


अभ्यासात सहभागी असलेल्या संशोधकांनी सांगितलं की, सरकारने हस्तक्षेप करून अधिक सखोल तपास करावा. त्याचप्रमाणे उंची कमी होण्याचं नेमकं कारण पाहून ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.