मुंबई : बाहेरच्या प्रदूषित हवेत जाण्यापेक्षा अनेकदा आपण घरात राहणं पसंत करतो. मात्र तुम्हाला माहिती आहे का बाहेरच्या हवेपेक्षा तुमच्या घरातील हवा जास्त प्रदूषित आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, घरातील वायू प्रदूषणामुळे दरवर्षी जगभरात सुमारे 40 लाख मृत्यू होत असतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांत संशोधनातून असं समजलंय की, घरं किंवा इतर इमारतींच्या आतील भागातील हवा ही बाहेरच्या हवेच्या तुलनेत अधिक प्रमाणात प्रदूषित असू शकते. 


अमेरिकेत पर्यावरण संरक्षण यंत्रणेच्या अहवालानुसार, बाहेरच्या तुलनेत घरातल्या प्रदूषणाचा स्तर दोन ते पाच पट तर कधी कधी 100 पटही जास्त असू शकतो. अनेकजण त्यांचा जवळपास 90 टक्के वेळ घरातच घालवतात. त्यामुळे हवेच्या गुणवत्तेचा आपल्यावर काय परिणाम होऊ शकतो, हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे.


अनेकदा जेवण बनवल्यानंतर घरात धूर होतो, पावसाळ्यात ओलसरपणा भिंतीला आलेली बुरशी आणि त्याची दुर्गंधी, हे अंतर्गत वायुप्रदूषणाचेच प्रकार आहेत.  व्होलाटाइल ऑरगॅनिक कम्पाउंड्सद्वारे होणाऱ्या प्रदूषणाचा पत्ता लावणं कठीण आहे. कारण ती कम्पाउंड्स म्हणजे असे वायू आहेत, की ज्यांना वास असतो किंवा नसतो. 


जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात म्हटल्याप्रमाणे, घरातल्या वायुप्रदूषणामुळे सर्दी, तसंच श्वास घ्यायला त्रास आदी लक्षणं जाणवू शकतात. नाक, डोळे, घशात जळजळ, वारंवार डोकेदुखी, थकवा, चक्कर येणं अशी लक्षणंही या प्रदूषामुळे दिसू शकतात.