मुंबई : आपल्या रोजच्या जेवणात भात आणि चपातीचा समावेश असतो, या गोष्टी जेवणातील सगळ्यात महत्वाच्या दोन गोष्टी आहेत. हे पदार्थ आपण भाजी आणि डाळसोबत घेतो. मग काही लोकं आवडीप्रमाणे लोणचे, पापड या सगळ्यांचा समावेश करतो. तुम्ही हे पाहिले असेल की जेव्हा जेव्हा थालीमध्ये रोटी आणि तांदूळ दोन्ही असतात तेव्हा लोक आधी रोटी आणि शेवटी भात खातात. पण, लोक हे का करतात? किंवा आधी चपातीच का खाली जाते? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? तर अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की चपाती नंतर भात खाणे हा योग्य निर्णय आहे का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही लोकांचं असं देखील मत आहे की, भात आणि चपाती खाऊ नयेत, कारण असे केल्याने आहारात संतुलन राहत नाही. अशा परिस्थितीत, चपाती म्हणजेच गहू आणि तांदळाशी संबंधित काही गोष्टी तुम्हाला माहित असलं पाहिजे, त्याची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.


चपाती आणि भात एकत्र खाणे योग्य आहे का?


जेवणात रोटी आणि भात एकत्र खाण्याबाबत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. अनेक तज्ज्ञ हे बरोबर मानतात, तर अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, शक्य असल्यास ते टाळले पाहिजे. एका अहवालात तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, दोन्ही एकत्र खाण्यात काहीच अडचण नाही, कारण दोन्ही समान धान्य आहेत आणि दोन्हीमध्ये कॅलरीज जवळजवळ समान आहेत. अशा परिस्थितीत शरीराला ते पचवणे फारसे कठीण नसते.


परंतु काही अहवालात असे देखील म्हटले आहे की, दोन्ही धान्ये एकत्र करु नयेत. हे दोन पदार्थ पोटात जाण्यासाठी थोडे अंतर असले पाहिजे. जेव्हा दोन्ही धान्य आतड्यात प्रवेश करतात तेव्हा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. दोन्ही धान्यांमध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असल्याने ते एकत्र ठेवल्याने तुमच्या शरीराला स्टार्च शोषण्यास मदत होते. जर तुम्ही असे केले तर ते सहज पचत नाही आणि गॅसची समस्या होऊ शकते.


परंतु हे लक्षात घ्या की, जर तुम्हाला काहीही त्रास होत नसेल तर, तुमच्या खाण्याची सवय बदलू नका आणि तुमच्या पोटासाठी जे चांगले आहे तेच खा.


आधी भात का खात नाही?


बऱ्याचदा लोकांचा असा विश्वास असतो की, जेव्हा तुम्ही प्रथम भात खाता तेव्हा तुमचे पोट काही वेळातच भरून जाते आणि त्यानंतर तुम्ही रोटी खाऊ शकत नाही. म्हणूनच लोक आधी रोटी आणि नंतर भात खातात.


तसेच जर तुम्ही फक्त भात खाल्लात तर तुमचे पोट लगेच भरते, परंतु तुम्हाला काहीवेळाने पुन्हा भूक लागू लागते.