ओठांंबाबत `8` इंटरेस्टिंंग गोष्टी !
ओठं हे तुमचं सौंदर्य खुलवण्यसाठी फार महत्त्वाची भूमिका बजावते. ओठांच्या आरोग्याकडे आपण अनेकादा फायसे लक्ष देत नाही. मात्र वाढत्या वयानुसार ओठांमध्येही बदल होतो. म्हणूनच ओठांबाबत या काही इंटरेस्टिंग गोष्टी नक्की जाणून घ्या.
मुंबई : ओठं हे तुमचं सौंदर्य खुलवण्यसाठी फार महत्त्वाची भूमिका बजावते. ओठांच्या आरोग्याकडे आपण अनेकादा फायसे लक्ष देत नाही. मात्र वाढत्या वयानुसार ओठांमध्येही बदल होतो. म्हणूनच ओठांबाबत या काही इंटरेस्टिंग गोष्टी नक्की जाणून घ्या.
ओठांबाबत काही इंटरेस्टिंग गोष्टी
ओठ पातळ होतात
वाढत्या वयानुसार ओठ पातळ होतात. जसजसे वय वाढते तसे शरीरात कोलेजन निर्माण होण्याची प्रक्रिया मंदावते. कोलेजन हा एक प्रोटीन घटक आहे. यामुळे पेशींची निर्मिती होते.
ओठांचा रंग गुलाबी
सामान्यपणे त्वचेवर 12 स्तर असतात मात्र ओठांवर केवळ 5 स्तर असल्याने ओठांचा रंग शरीराच्या इतर रंगापेक्षा वेगळा असतो.
ओठांवर घाम येत नाही
ओठांमध्ये घामग्रंथी नसतात त्यामुळे ओठांना घाम येत नाही.
ओठांनाही लाकवा मारू शकतो
ओठ हे केवळ स्नायूपासून बनवले असतात. त्यामुळे त्याला लकवा मारण्याचा धोका असतो. यामुळे आकार बिघडण्याचा धोका असतो.
शिटी वाजवायला ओठ मदत करतात
शिटी वाजवण्यासाठी ओठ फार महत्त्वाची भूमिका साकारतात. ओठांमधील ऑर्बिकुलरिस ओरिस (Orbicularis oris)हा स्नायू त्यासाठी मदत करतो.
'बी' आणि 'पी' उच्चारणं अशक्य
ओठांशिवाय 'बी' आणि 'पी' ही अक्षरं उच्चारणं अशक्य आहे. पाहिजे तर तुम्ही आता हे उच्चारून तपासूनही पाहू शकता.
ओठ सुकतात
शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाले की तात्काळ त्याचा परिणाम ओठांवर दिसून येतो. मुबलक पाणी न प्यायल्यास ओठ सुकतात, फाटतात. व्हिटॅमिन बीच्या कमतरतेमुळेही ओठ फाटण्याचा त्रास बळावतो.