Intermittent Fasting : झटपट वजन कमी करण्यासाठी उपवास करताय? मग ही बातमी वाचा!
आज आम्ही तुम्हाला Intermittent Fasting काय आहे याविषयी सांगणार आहोत.
Intermittent Fasting: गेल्या काही वर्षांत, लोकांमध्ये वजन कमी (weight loss) करण्याचा कल झपाट्याने वाढला आहे. त्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब केला जात आहे. यापैकी एक म्हणजे इंटरमिटंट फास्टिंग (Intermittent Fasting), जो आजकाल लोकांच्या ओठांवर आहे. मोठ्या संख्येने लोक अशा प्रकारे वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. यापैकी अनेकांना हे करण्याचा योग्य मार्ग माहित नाही, ज्यामुळे त्यांना फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला Intermittent Fasting काय आहे याविषयी सांगणार आहोत. (Intermittent Fasting for quick weight loss Then read this news nz)
आणखी वाचा - Dark Upper Lips: ओठांवरील काळे डाग नको असल्यास करा 'हे' घरगुती उपाय
Intermittent Fasting म्हणजे काय?
Intermittent Fasting वजन कमी करण्यासाठी वापरले जाणारे Diet आहे, ज्यामध्ये एखादी व्यक्ती दिवसभरात ठराविक वेळी अन्न खाते आणि उर्वरित तासांमध्ये Diet केला जातो. या Diet मध्ये तुम्हाला खाण्याची योजना तयार केली जाते, ज्यामध्ये सर्वात प्रचलित 16:8 पॅटर्न असतो. या पॅटर्ननुसार एखादी व्यक्ती फक्त दिवसाच्या 8 तासांमध्ये अन्न खाऊ शकते. तर उर्वरित 16 तासात केवळ पाणी पिऊनच Diet करावा लागतो. या Diet ला वजन कमी करण्याचा एक उत्तम मार्ग मानला जातो.
लोक सहसा काय खावे यावर लक्ष केंद्रित करतात. तर Intermittent Fasting करताना कधी खावे हे महत्त्वाचे असते. दररोज काही तास उपवास केल्याने किंवा आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच खाल्ल्याने तुमच्या शरीरातील कॅलरीज बर्न होऊ शकतात. यामुळे तुमचे वजन कमी होऊ शकते.
Intermittent Fasting मध्ये दररोज 12 किंवा 16 तास उपवास करणे आणि उर्वरित तासांमध्ये अन्न खाणे महत्त्वाचे आहे. 16/8 पद्धत हे एक लोकप्रिय उदाहरण आहे. दररोज 16 तासांचा उपवास आणि 8 तासांची खाण्याची खिडकी असते, ज्यामध्ये तुम्ही 2, 3, 4 वेळा खाऊ शकता. खाण्याचे तास कमी आहेत म्हणून लोकांना पुरेशी प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे असलेले संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. जीवनसत्त्वे आणि इतर पोषक तत्वांनी युक्त आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे.
आणखी वाचा - तुम्हीही आहात Overthinking चे शिकार? हे उपाय नक्कीच उपयोगी ठरतील
वजन कमी करण्यासाठी आणि मधुमेह नियंत्रणासाठी या पद्धतीचे समर्थन करणारे अनेक अभ्यास आहेत. काहीजण समर्थन देत नसले तरी खाण्यासाठी मर्यादित वेळ असल्याने कॅलरीजही आपोआप कमी होतात ज्यामुळे वजन कमी होते.
(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)