#International YogaDay 2018 : सूर्यनमस्कारापूर्वी आणि नंतर `या` चूका नक्की टाळा
योगाअभ्यासाचं मूळ भारतामध्ये आहे.
मुंबई: योगाअभ्यासाचं मूळ भारतामध्ये आहे. आज भारताबाहेरही योगाभ्यासाला खास महत्त्व आहे. विविध स्वरूपात योगा केला जाऊ शकतो. सूर्यनस्कार हे अनेक योगासनांचे एकत्रित स्वरूप आहे. त्यामुळे नियमित केवळ सूर्यनमस्कारही करणं फायदेशीर आहे. धकाधकीच्या जीवनशैलीतून स्वतःसाठी किमान 10 मिनिटं काढून तुम्ही नियमित सूर्यनमस्कार करू शकता. पण नवशिख्यांनो ! सूर्यनमस्कार करतानाअ काही चूका टाळल्यास यामधून तुम्हांला आरोग्यदायी फायदे होण्याची शक्यता अधिक आहे. सकाळ की संध्याकाळ - कधी करावा सूर्यनमस्कार ?
सूर्यनमस्कार करताना कोणती काळजी घ्याल ?
जर तुम्ही सूर्यनमस्कार करण्यासाठी नवखे असाल तर तुम्हाला वॉर्म अपची अत्यंत गरज आहे. त्यामुळे तुमचे मेटाबोलिझम सुधारेल आणि तुमचे शरीर व्यायामासाठी तयार होईल. तसंच त्यामुळे स्नायू आखडले जाणार नाहीत किंवा त्यांना इजा पोहचणार नाही.
वॉर्म अप प्रमाणे सातत्याने केलेल्या सूर्यनमस्कारानंतर नंतर १०-२० मिनिटं कूल डाउन ची देखील गरज असते.
थोडी विश्रांती घेतल्याशिवाय अंघोळ करू नका.
हृदयाची वाढलेली गती सुरळीत होण्यासाठी आणि शरीर पूर्ववत होण्यासाठी पुरेसा वेळ द्या.
विश्रांती घेण्यासाठी काही वेळ पाठीवर झोपा, पवनमुक्तासन यासारखी आसने केल्याने ही फायदा होईल.
ताठ बसून १५ मिनिटे ध्यान करा. प्राणायाम केल्याने ही खूप रिलॅक्स वाटेल. सगळ्यात उत्तम म्हणजे शवासन. त्यात कोणत्याही प्रकारची शारीरिक हालचाल नसल्यामुळे शरीर व मनाला पुरेशी विश्रांती मिळते.