मुंबई : योगाभ्यास हा भारतीय  सांस्कृतिक ठेवींपैकी महत्त्वाचा ठेवा आहे. आज भारतापेक्षा पाश्चात्य देशांमध्ये या विद्येला अधिक मागणी आहे. 

वजन आटोक्यात ठेवण्यासाठी किंवा काही आजारांना दूर ठेवण्यासाठी योगाभ्यास अधिक फायदेशीर आहे. त्यामुळे जीम, डाएटपेक्षा योगाभ्यास करण्याचा सल्ला दिला जातो. 

 

योगा म्हणजे ध्यान किंवा सकाळीच लवकर उठून करायचा व्यायम असा काहींचा समज आहे. परंतू रात्री तुमच्या वेळेनुसआर व्यायाम करता येऊ शकतो का ? हे नक्की जाणून घ्या.  

 

रात्रीच्या वेळेसही काही आसनं करणं फायदेशीर आहेत. त्यामुळे रात्रीची झोप शांत लागते. मन शांत होते. तसेच पचन क्रिया सुधारते. 

 

# रात्रीचा योगाभ्यास करणार असाल तर तो किमान जेवणानंतर 2-3 तास करू नये. 

 

# जर 9 वाजता योगा करणार असाल तर 6.30 पर्यंत जेवण आटपून त्यानंतर एखादे फळ खाऊन योगा करू शकतात.  

 

# दिवसभराचा ताण हलका करण्यासाठी पश्चिमोत्तासन, उत्तनसन करा.  यामुळे पाठीच्या कणाला चालना मिळते.  

 

# रात्रीच्या वेळेस योगा करताना योगानिद्रा फायदेशीर ठरते. यामुळे दिवसभराचा ताण कमी होतो.  

 

#  तुमचा योगाभ्यास झाल्यानंतर किमान तासाभरानंतर झोपा. 

 

#  मासिकपाळीच्या पहिल्या एक- दोन दिवसांमध्ये रात्रीच्या वेळेस योगाभ्यास करू नका. तसेच गरोदर स्त्रियांनीदेखील रात्रीच्या वेळेस योगा करणं शक्यतो टाळावी.