मुंबई : वाढत्या उन्हात लोकं अनेकदा थंड पाणी पिणं पसंत करतात. तुम्हीही असं करत असाल. मात्र थंड पाणी प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो. पण व्यायामानंतर थंड पाणी पिणं योग्य आहे का? ते आपल्या शरीरासाठी योग्य आहे का? तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, वर्कआऊट किंवा व्यायामानंतर थंड पाणी पिणं तुमच्या शारीरिक आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, व्यायामानंतर तुमचे शरीर गरम असतं. अशा स्थितीत जेव्हा तुम्ही थंड पाणी पिता तेव्हा अचानक तुमच्या शरीराचं तापमान खालावतं. अशा परिस्थितीत तुमच्या वर्कआउटची मेहनत वाया जाऊ शकते. म्हणून, व्यायामानंतर नेहमी साधं पाणी प्यावं. यामुळे तुमच्या शरीराचं वजन कमी होईल. 


वर्कआऊटनंतर थंड पाणी पिण्याचं नुकसान


वजन वाढण्याची शक्यता


व्यायामानंतर थंड पाण्याचे प्यायल्याने तुमचं वजन वाढू शकतं. यामुळे पोटाची चरबी वाढण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत जर तुम्ही वर्कआऊटद्वारे वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर थंड पाणी प्यायल्याने तुमची मेहनत वाया जाऊ शकते. 


डोकेदुखी


वर्कआउट केल्यानंतर थंड पाणी प्यायल्याने डोकेदुखी आणि सायनसची समस्या उद्भवू शकते. जर तुम्ही बर्फाचे तुकडे टाकून पाणी प्यायलात तर ते तुमच्या मणक्यातील संवेदनशील नसा थंड करते. अशा स्थितीत त्याचा तुमच्या मेंदूवर परिणाम होतो.


पचनकार्यावर परिणाम


हेवी वर्कआऊट केल्यानंतर अचानक थंड पाणी प्यायल्यानंतर तुमच्या शरीरात थंड-गरम अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे पोटदुखी, क्रॅम्स आणि पचनाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो.