मुंबई : पावसाळ्याच्या दिवसात ऋतूमानात बदल झाला की आपल्या आहारातही बदल होतो. या दिवसांमध्ये व्हायरल इंफेक्शन झपाट्याने पसरत असते. त्यामुळे नेमके आहारात काय खावे ? हा प्रश्न लोकांच्या मनात येतो. वातावरणात थंडावा असल्याने सर्दी, पडसे, खोकल्याचा त्रास होईल म्हणून अनेकजण घाबरून दही खाणं टाळतात. मात्र खरंच पावसाळ्यात दही टाळावं का ?  


पावसाळ्यात दही टाळावे का? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उन्हाळ्यात उष्णतेवर मात करण्यासाठी अनेकजण दह्याचा नियमित वापर करतात. पावसाळ्यात पचनशक्ती कमजोर असते. त्यामुळे दही खाणं अत्यंत फायदेशीर आहे. मात्र दही आंबट किंवा खूप दिवस जुने असू नये. 


पावसाळ्याचा दिवसात शक्यतो रात्रीच्या वेळेस दही खाणं टाळावे. दिवसा तुम्ही जेवणासोबत दही खाऊ शकता. 


पावसाळ्यात पोट बिघडल्याने डायरिया, फूड पॉयझनिंगचा त्रास होतो. अशावेळेस दही भात, दही, ताक पिणे फायदेशीर ठरते. दह्यातील प्रोबायोटीक गुणधर्म आतड्यांचं आरोग्य जपण्यासाठी फायदेशीर आहे.