मुंबई : आजकाल कॅन्सरचा धोका वाढत आहे. हा आजार दुर्धर असल्याने त्याचं नाव एकलं तरी अनेकांच्या मनात भीती दाटून येते. कोणालाही आणि वयाच्या कुठल्याही टप्प्यावर कॅन्सर गाठू शकतो. त्यामुळे या आजाराचा धोका कमी करण्यासाठी योग्य वेळी त्याचं निदान करणं आवश्यक आहे. .शरीराची ही ८ लक्षणे देतात कॅन्सराचा इशारा!  


अमेरिकन युनिव्हर्सिटीचा दावा - 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकन युनिव्हर्सिटीमध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार, शरीरात व्हिटॅमिन डीचं प्रमाण अधिक  असल्यास मोनोपॉजच्या पुढील टप्प्यावरील महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी करण्यास मदत करतो. तीन हजाराहून अधिक महिलांमध्ये करण्यात आलेल्या प्रयोगानंतर संशोधकांनी काही दावे केले आहेत. 


सॅन डिएगोमधील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफॉर्नियाच्या संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार, मोनोपॉजच्या पुढील टप्प्यात असणार्‍या महिलांच्या रक्तात व्हिटॅमिन डीचं प्रमाण अधिक असलेल्यांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण कमी झाले आहे. 


संशोधकांनी 55 वर्षांपुढील आणि सरासरी 63 वर्षांच्या महिलांवर 2002 - 2017 या काळात प्रयोग करण्यात आला. संशोधनापूर्वी महिलांमध्ये कॅन्सर नव्हता. मात्र प्रति चार वर्षांतून एकदा त्यांच्या रक्ताची चाचणी करण्यात आली. यामध्ये व्हिटॅमिन डीचीदेखील चाचणी करण्यात आली. 


काय आहे संशोधकांचा दावा ?


सामान्यपणे रक्तात व्हिटॅमिन डीचं प्रमाण 60 नॅनोग्राम प्रति मिलीलीटर असणं सामान्य मानलं जातं. कमीत कमी हे प्रमाण 20 नॅनोग्राम प्रति मिलीलीटर असावं. मात्र संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार, प्रयोगादरम्यान ज्या महिलांची चाचणी करण्यात आली त्यामध्ये 60 नॅनोग्राम प्रति मिलीलीटर पेक्षा अधिक असणर्‍यांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा धोका केवळ 20% 
होता. 


संशोधकांचा हा निष्कर्ष केवळ मेनोपॉजच्या टप्प्यातील महिलांबाबत आहे. व्हिटॅमिन डीचा स्तर प्रि- मोनोपॉजल महिलांवरही परिणाम करतो क? याबाबतचं संशोधन अजूनही सुरू आहे. त्याबाबत स्पष्टता देण्यात आलेली नाही.