मुंबई : उन्हाळ्याचे दिवस म्हटलं की जांभूळ हा फळ आपल्याला बाजारात सर्वत्र दिसतो. या लहान आकाराच्या फळाची ओढ प्रत्येकाला असते. आकाराने लहान असला तरी जांभूळ फळाचे अनेक फायदे आहेत. मूळ दक्षिण आशिया आणि आग्नेय आशियात आढणाऱ्या जांभूळ फळाचे शास्त्रीय नाव 'सायझिजियम क्युमिनी' असे आहे. जांभळ्या रंगाच्या या फळाची चव गोड-तुरट असते. हा पुरातन उपयुक्त वृक्ष आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातूनही फार महत्वाचा आहे . 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जांभळाच्या सुकलेल्या बियांचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, जांभळामध्ये रक्तातील शर्करेचे प्रमाण कमी करण्याचे तत्व असतात. सुगंधी पाने आणि गुणकारी बीज, फळे, फुले असलेल्या या वृक्षाचा उपयोग प्राचीन काळी सौंदर्य प्रसाधने तयार केला जात असे. 


मधुमेह नियंत्रित ठेवण्याबरोबरच शरीरातून हानिकारक केमिकल्स बाहेर टाकण्यास जांभळाच्या बियांचा उपयोग होतो. म्हणून जांभूळ खाऊन बिया फेकून देण्यापूर्वी त्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या. 
 
१) मधुमेहावर नियंत्रण : जांभळामध्ये अँटी डायबेटीक गुणधर्म असतात. जांभळाच्या बिया सुकवून त्याची पावडर करा आणि दिवसातून तीनवेळा खा. मधुमेहावर हा अत्यंत चांगला उपाय आहे. दूध किंवा पाण्यासोबत ही पावडर सकाळी रिकाम्या पोटी घ्या. त्यामुळे देखील मधुमेह नियंत्रित राहील. हा उपाय पारंपरिक असून अतिशय परिणामकारक आहे.


२) रक्तदाबाचा त्रास कमी होतो : मधुमेहासोबतच रक्तदाबाचा त्रास कमी करण्यास जांभूळ फायदेशीर आहे. जांभळाच्या बियांचा रस किंवा अर्क नियमित घेतल्यास रक्तदाब ३४.६ टक्क्यांनी कमी होतो.


३) पोटांच्या विकारांवर उपयुक्त : पचन संस्था स्वच्छ करण्यासाठी आणि पोटाचे विकार दूर करण्यासाठी जांभूळ उपयुक्त ठरते. बियांचा अर्क जखम किंवा आतड्यातील अल्सर  इन्फेकशन दूर करण्यास फायदेशीर आहे. जुलाब झाल्यास जांभळाच्या बियांची पावडर साखरेत मिसळून दिवसातून २-३ वेळा घ्या.