टोकियो : कोंबडीच्या अंड्यात असलेल्या विशिष्ट घटकांमुळे विविध गंभीर आजरांवर अगदी कॅन्सरवर देखील ते फायदेशीर ठरते, असे जापनीस संशोधकांनी अलीकडे प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. 
संशोधक जर कोंबडीच्या अंड्यापासून 'interferon beta' हे एका प्रकारचे प्रोटीन बनवू शकले तर त्याचा उपयोग हिपॅटायटीस यांसारख्या आजरांवर होऊ शकतो. मात्र ते अत्यंत महाग असेल. काही मायक्रोग्रॅम औषधाची किंमत असेल १००,००० येन, असे जापनीस वृत्तपत्रात म्हटले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

National Institute of Advanced Industrial Science and Technology (AIST) च्या संशोधकांनी कोंबड्याच्या स्पर्म्समध्ये interferon beta उत्पन्न करणारे सेल्स सोडले. ते सेल्स अंड फर्टीलाइज करण्यासाठी वापरणार असल्याने कोंबडीत आपसूकच ते जीन्स येणार. त्यामुळे त्या कोंबड्यांनी दिलेल्या अंड्यात आजरावर मात करणारे घटक असणार. 


संशोधकांकडे अंड्यात ते विशिष्ट घटक असलेल्या तीन कोंबड्या आहेत. या कोंबड्या बहुतांशी दररोज अंडी देतात, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. हे औषध फार्मास्युटिकल कंपन्यांना विकण्याचा संशोधकांचा मानस आहे. 


मात्र हे औषध उपलब्ध होण्यासाठी ग्राहकांना काहीशी वाट बघावी लागणार आहे. कारण पूर्ण प्रक्रिया होण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागू शकतो. मात्र संशोधकांच्या टीमने असे सांगितले आहे की, "या औषधाच्या किंमती १० टक्क्यांनी कमी होतील," असे जापनीस वृत्तपत्रात म्हटले आहे.