मुंबई : जवसचा वापर रोजच्या आहारात करणे महत्त्वाचे आहे. भाकरीबरोबर जवस किंवा अळशीची चटणी हा मेनू खास ग्रामीण असला तरी जवसाचं महत्त्व सगळ्यांना कळायला लागलं आहे. जवसच्या नियमीत सेवनाने रक्तातील साखर, ट्रायग्लिसराईड्स, हिमोग्लोबिन आणि कोलेस्टेरॉल आटोक्यात राहू शकतात. स्त्रियांच्या बाबतीत हॉर्मोन्सची पातळी योग्य ठेवण्यासाठी जवसाचा उपयोग होतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- हिरड्या मजबूत करण्यासाठी आणि दात दुखत असल्यास त्यावर जवसचे तेल फायदेशीर ठरते. 


- जवसाचं पीठ घेऊन त्याने छाती शेकली तर कफ पातळ होऊन तो बाहेर पडण्यास मदत होते. यामुळे तापाचे प्रमाण देखील कमी होईल.
 
- पाठ दुखत असेल तर दुखणाऱ्या जागी जवस बांधून ठेवावे.


- एखाद्या ठिकाणी भाजलं असेल तर त्या ठिकाणी जवसचं तेल आणि चुन्याची निवळी एकत्र करुन बांधावी. यामुळे जखम लवकर बरी होते.


आहारात जवसाचा वापर केल्यास भूक वाढते आणि पचनक्रिया देखील चांगली राहते.