मुंबई : बदलती लाइफस्टाईल फक्त आपल्या आरोग्यावर नाही, तर हाडांवरही प्रभाव करत आहे. हाडांना मजबूत ठेवण्यासाठी योग्य आहार आणि पौष्टीक अन्न सेवन करणे गरजेचे आहे. खूप वेळ वातानुकूलित वातावरणात राहिल्यामुळे हाडं कमकूवत होतात. त्यामुळे एसीची सवय सोडा, तेव्हाच तुमच्या हाडांची मजबुती टिकून राहील. एसीशिवाय आणखी खूप गोष्टी आहेत, जे करणे टाळले पाहिजे, जर तुम्हाला हाडांना मजबूत ठेवायचे असेल तर.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सतत एसीमध्ये राहिल्याने हाडे कमकूवत होतात. सर्वेनुसार एक गोष्ट समोर आली आहे, एसीची हवा हाडांना कमकूवत करते. 


टीव्हीवर आपला फेव्हरेट शो बघणे वाईट गोष्ट नाही. परंतू खूप वेळ टीव्ही समोर बसल्याने हाडांना त्रास होतो. जेव्हा आपण खूप वेळ एकाच ठिकाणी बसून असतो आणि आपल्या शरिराची हालचाल होत नाही, तेव्हा हाडांना त्रास होतो.


सायकल चालवल्याने हृदय आणि फुफ्फुसे मजबूत होतात परंतू, त्यामुळे हाडे कमकूवत होतात. खरं तर सायकल चालवल्याने हाडांच्या डेंसिटीमध्ये फरक नाही पडत. तुम्हाला सायकल चालवणे आवडत असेल तर तुम्हाला सायकल चालवण्यासोबत धावणे, नृत्य करणे, पोहणे यासारख्या गोष्टीवर देखील लक्ष केंद्रीत केले पाहिजे.


हाडांना मजबूत ठेवण्यामागे विटामिन-डी खूप गरजेचे आहे. आठवड्यातून १० ते १५ मिनिटे उन्हात उभे राहून विटामिन-डी घेतले पाहिजे परंतू, खूप वेळ उन्हात राहण्यापासून टाळा. कारण त्यामुळे स्किन कॅन्सरसोबत दुसरे स्किन संबंधित आजार होण्याची शक्यता असते. 


हाडांना मजबूत ठेवण्यासाठी अशा गोष्टींचे सेवन करा ज्यात विटामिन-डी अधिक प्रमाणात आहे. जेवणात दूध, बदाम, तांदूळ, जूस या गोष्टींचा समावेश करा.