रोजच्या आहारात करा `या` काळ्या बियांचे सेवन; वजन झरझर होईल कमी, असे करा सेवन
Kalonji Seeds Benefits: वजन कमी करण्यासाठी आपण हरप्रकारे प्रयत्न करत असतो. पण आहारात योग्य पदार्थांचा समावेश केल्यास वजन कमी करण्यास फायदेशीर ठरु शकते.
Kalonji Seeds Benefits: बदलती जीवनशैली आणि खाण्या-पिण्याच्या सवयी यामुळं वजन वाढते. वजन वाढण्याची समस्या हल्ली खूप वाढीस लागली आहे. वजन कमी करण्यासाठी योग्य आहार आणि योग्य व्यायाम करणे खूप गरजेचे आहे. मात्र, आजच्या धकाधकीच्या काळात व्यायामासाठी वेळ मिळत नाही. पण आहारात पौष्टिक घटकांचा समावेश केल्यास वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते. रोजच्या आहारात या काळ्या रंगाच्या बियांचे सेवन केल्यास वजन कमी होऊ शकते. तसंच, अनेक आजारांपासून आराम मिळू शकतो. कलौंजीचा वापर करुन तुम्ही अनेक आजारांवर मात करु शकता. कलौंजीमध्ये अँटी ऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असतात. या बियांमध्ये अँटी इंफ्लेमेटरी गुणदेखील असतात.
कलौंजीच्या बियांच्या पाण्यात मध टाकून प्यायल्यास वजन कमी होण्यास मदत होते. कलौंजीच्या अन्य फायद्यांबाबत आज जाणून घेऊया. दररोज कलौंजीचे पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते. कलौंजीच्या बियांची पावडर बनवून रात्री झोपण्याच्या आधी ही पावडर एक ग्लास कोमट पाण्यात मिसळून हे पाणी पिऊ शकता. कलौंजीच्या पाण्याने वजन कमी करता येऊ शकते. वजन कमी करण्याव्यतिरिक्त कलौंजीचे अन्य फायदेदेखील आहेत. कोणते ते जाणून घेऊया.
कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवते
शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल वाढल्यास हृदयाचे आरोग्य बिघडते. त्यामुळं हृदयविकाराचा झटका, हाय ब्लड प्रेशर, किडनीची समस्या आणि अन्य आजार होऊ शकतात. कलौंजीच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात येते.
लिव्हरसाठी फायदेशीर
कलौंजीमध्ये असलेले अँटी ऑक्सीडेंट लिव्हरमध्ये होणाऱ्या इंन्फेक्शनपासून बचाव करते. याच्या सेवनाने पाचनसंस्थाही निरोगी राहते.
मधुमेह असल्यास...
कलौंजी मधुमेहाच्या रुग्णांसाठी रामबाण उपाय आहे. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्याचे काम कलौंजी करते. कलौंजी आणि लिंबाच्या सेवनाने ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवता येऊ शकते.
हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
कलौंजी हृदयाच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. रात्री झोपण्याच्या आधी एक ग्लास कोमट पाण्यात कलौंजी पावडर टाकल्यास कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशरची मात्र नियंत्रणात येण्यास मदत मिळते.
कलौंजीचे सेवन कसे कराल?
दररोज 2 ग्रॅम कलौंजीचे सेवन करावे. कलौंजीच्या बियांची पावडर करुन घ्या आणि ही एक चमचा ही पावडर कोमट पाण्यात टाकून प्या. त्याव्यतिरिक्त मसाला म्हणूनही कलौंजीचा वापर करु शकता. कलौंजीच्या बिया, जीरा, धणे आणि बडिशेप भाजून घ्या आणि नंतर त्याची पावडर करुन घ्या. भाजी बनवताना या मसाल्याचा वापर करा.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)