लंडन : कोरोना विषाणूपासून तुम्हाला दूर रहायचं असेल तर, दातांच्या आणि तोंडाच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, विषाणू तोंडावाटे फुफ्फुसांमध्ये पोहचण्याची जोखीम तोंड स्वच्छ केल्याने कमी होते. हा सहज उपाय वाटत असला तरी तो परिणामकारक असल्याचे एका अभ्यासात समोर आले आहे. जर्नल ऑफ ओरल मेडिसिन एँड डेंटल रिसर्चमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार या गोष्टीचे पुरावे मिळाले आहेत. की, व्यवस्थित आणि योग्य पद्धतीने तोंड स्वच्छ साफ ठेवल्यास, कोविड 19 ला जबाबदार असलेल्या विषाणूना निष्क्रिय करण्यात प्रभावी ठरू शकतो.


स्वच्छता यासाठी गरजेची


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना विषाणू लाळेवाटे फुफ्फुसांमध्ये जाऊ शकतो. हिरड्यामध्ये रक्तस्रावाचा त्रास असलेल्या लोकांनी जास्त खबरदारी घेणे गरजेचे आहे. विषाणू रक्त प्रवाहासोबत सरळ फुफ्फुसांमध्ये पोहचू शकतो. त्यामुळे दात आणि तोंड व्यवस्थित स्वच्छ करत राहिल्याने विषाणू फुफ्फुसांत जाण्याचा धोका टळू शकतो.


माऊथवॉश नसेल तर मिठाचे पाणीही गुणकारी


ब्रिटेनच्या बर्मिंघम विद्यापीठाचे प्राध्यापक आणि या अहवालाचा सह लेखक इयान चॅपेलने म्हटले आहे की, काही लोकांना  कोव्हिड 19 मुळे फुफ्फुसांचा आजार होतो तर काहींना नाही. सावधानीपूर्वक दातांची स्वच्छता केल्यास तसेच माऊथवॉशचा उपयोग केल्यास विषाणूचा नायनाट होऊ शकतो. माऊथवॉश नसल्यास मिठाच्या कोमट पाण्याने गुळण्या केल्यास हिरड्यांची सूज कमी होऊ शकते. ज्यामुळे लाळेत विषाणूला निष्क्रीय करण्यात मदत होऊ शकते.


( हा लेख सामान्य माहितीच्या आधारावर आहे. कोणत्याही प्रकारच्या आरोग्याच्या समस्येसाठी वैद्यकिय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा )