केरळ : 'निपाह' व्हायरसने केरळमध्ये 16 जणांचा बळी घेतल्यानंतर या आजाराबाबत देशभरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. 'निपाह' या जीवघेण्या व्हायरसचा संसर्ग झाल्यानंतर तातबतोब उपचार न मिळाल्यास अवघ्या काही तासातच रूग्ण कोमामध्ये जाण्याची दाट शक्यता असते. म्हणूनच या जीवघेण्या आजाराबाबत सरकारही खबरदारी पाळत आहे. 


आरोग्यमंत्र्यांची माहिती 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निपाहचा वाढता धोका पाहता त्यापासून बचावण्यासाठी विशेष दक्ष राहणे गरजेचे आहे. केरळमध्ये 'निपाह'ला पहिल्या टप्प्यात रोखण्यास सरकार आणि आरोग्यसेवांना यश मिळाले आहे. मात्र भविष्यात 'निपाह'मुळे संसर्ग वाढल्यास दुसर्‍या टप्प्यावर त्याला रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत अशी ग्वाही केरळच्या आरोग्यमंत्री के.शैलजा यांनी दिली आहे. Nipah Virus अलर्ट - केरळमधील निपाहच्या थैमानामागे बांग्लादेशी कनेक्शन


परदेशातून औषध 


'निपाह' हा फ्रुट्स बॅट प्रजातीच्या वटवाघुळांमध्ये आढळणारा एक व्हायरस आहे. वटवाघुळांमध्ये हा व्हायरस नैसर्गिकरित्या आढळतो. मात्र मनुष्यामध्ये त्याचा संसर्ग झाल्यास तो जीवघेणा ठरतो. त्यामुळे 'निपाह' रोखण्यासाठी अजूनही ठोस औषध किंवा इंजेक्शन भारतामध्ये नाही. केरळमधील 'निपाह'ची साथ रोखण्यासाठी सध्या ऑस्ट्रेलियामधून काही औषधं मागवण्यात आली आहेत. या औषधाबाबत डॉक्टरांना प्रशिक्षण देण्याचं काम सुरू आहे. Nipah Virus चा धोका पाहता फळं खाणं टाळावे का? वाचा हा एक्सपर्ट सल्ला ​


सध्या केरळमधील परिस्थिती काय? 


केरळ राज्यातील आरोग्यसेवेवर सरकारचे विशेष लक्ष आहे. 
कोझिकोडे भागात 'निपाह' झपाट्याने पसरत होता. मात्र परिस्थिती नियंत्रणात आल्याने शाळा १२ जूनपासून पुन्हा सुरू केल्या जाणार आहेत.
कोझिकोडेच्या वैद्यकीय विद्यापीठामध्ये ८० खोल्या निपाह रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. 
केरळच्या दोन राज्यांमध्ये निपाह आढळल्याने त्या भागातील निपाह सदृश्य रूग्णांवर खास लक्ष ठेवले जात आहे. लोकांना घाबरून न जाता विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.  Nipah Virus चा धोका ! सध्या केरळ ट्रीप करणं खरंच सुरक्षित आहे का?