Nipah Virus चा धोका पाहता फळं खाणं टाळावे का?

'निपाह' या व्हायरसमुळे सध्या केरळप्रमाणेच देशभरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. 

Updated: May 25, 2018, 10:19 PM IST
Nipah Virus चा धोका पाहता फळं खाणं टाळावे का?  title=

मुंबई : 'निपाह' या व्हायरसमुळे सध्या केरळप्रमाणेच देशभरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. व्हायरसची लागण झाल्यानंतर वेळीच उपचार न घेतल्यास अवघ्या 24-48 तासामध्ये हा व्हायरस जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळेच सरकारने देशातील काही राज्यांमध्ये अलर्ट जाहीर केला आहे. निपाह व्हायरसमुळे केरळमध्ये 11 जणांनी आपले प्राण गमावले आहेत. 

वटवाघुळांमुळे पसरतोय 'निपाह'  

'निपाह' हा व्हायरस वटवाघुळांमुळे पसरत अअहे. वटवाघुळांनी खाल्लेली फळं किंवा त्यांच्या संपर्कात आलेली फळं, प्राणी आणि माणसांद्वारा 'निपाह' व्हायरस झपाट्याने पसरत आहे. वटवाघुळांची लाळ फळांवर राहते परिणामी त्याच्या संपर्कात आल्याने व्हायरस पसरत आहे. त्यामुळे फळांचं सेवन सावधानतेने करणं आवश्यक आहे.  'निपाह' व्हायरसची दहशत पसरवाणारी करोडो वटवाघुळं 'या' गावात फळं खातात

'निपाह' व्हायरसचा वाढता धोका पाहता अनेकजण फळांचं सेवन टाळत आहे. भीतीपोटी असेल किंवा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अनेकजण फळांचं सेवन टाळतात. म्हणूनच फळं खावीत का ? याबाबतचा एक्सपर्ट सल्लादेखील नक्की जाणून घ्या.  Nipah Virus चा धोका ! सध्या केरळ ट्रीप करणं खरंच सुरक्षित आहे का?

फळांचं सेवन करताना कोणती काळजी घ्याल ?  

फळं विकत घेतानाच त्याची पडताळणी करून घ्या. फळांवर एखाद्या प्राण्याने चावल्याचा किंवा ओरखडा पडल्याचं निशाण नाही ना ? याची खात्री करून घ्या. 

तुम्ही नकळत काही फळं उचलली असतील तर  खाण्यापूर्वी ती स्वच्छ धुवून घ्यावी. कोमट पाण्यात फळं 20 मिनिटं ठेवावीत. यामुळे त्यावरील विषाणूंचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.  

केरळमधून येणार्‍या फळांचं सेवन टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. प्रामुख्याने आंबे, केळं, खजुराचं फळं खाणं टाळा. 

जाड सालीच्या फळांमध्ये वटवाघुळांच्या दंशाने संसर्ग आत जाणं कठीण होऊन बसते परिणामी अशा फळांचं सेवन कमी धोकादायक आहे. 

रमजानचा महिना सुरू असल्याने खजुराची मागणी अधिक असते. पॅक केलेला खजुर खाणं सुरक्षित आहे. निपाह  व्हायरसची दहशत पसरण्यापूर्वी पॅक झालेला खजूर तुम्ही सुरक्षितपणे खाऊ शकता.  निपाह व्हायरस पसरण्याची कारणे, लक्षणे आणि उपाय...