मुंबई : किडनी (Kidney Diseases) हा शरीरातला सर्वांत महत्वाचा भाग आहे. जर हा महत्वाचा भाग खराब झाला तर तुम्हाला भयंकर अडचणींना सामोरे जावे लागेल. त्यामुळे किडनी खराब होण्याआधी कोणत संकेत देत असते, याबाबतची माहिती जाणून घेऊयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरीरावर होतो मोठा परीणाम
किडनी (Kidney Diseases) नीट काम करत नसेल किंवा त्याच्या कामात अडथळे येत असतील तर सर्व विषारी पदार्थ शरीरातच जमा होऊ लागतात. त्याचा नकारात्मक परिणाम शरीरावर दिसू लागतो. घाणेरडे पदार्थ शरीरात जमा होत असल्याने त्याचा परिणाम तोंडावर दिसू लागतो. तोंडातून वास येऊ लागतो. दात गळण्याची भीती सतावू लागते. तोंडातून दुर्गंधी येत असेल आणि ती कोणत्याही प्रकारे जात नसेल, तर सावध राहण्याची गरज आहे.


'हे' संकेत असतात
जेव्हा किडनी (Kidney Diseases) खराब होऊ लागते तेव्हा ते संकेत देऊ लागते. यामध्ये त्वचेचा कोरडेपणा, खाज सुटणे, सांधे आणि पायांना सूज येणे, अशक्तपणा आणि थकवा जाणवणे, वारंवार किंवा खूप कमी लघवी होणे यांचा समावेश होतो


'या' कारणांमुळे किडनी खराब होते
अनेक कारणांमुळे मूत्रपिंडाचे (Kidney Diseases) नुकसान होऊ शकते. जसे कमी पाणी पिणे, जास्त मीठ सेवन करणे, धूम्रपान करणे आणि तंबाखूचे सेवन करणे, लघवी जास्त वेळ रोखून ठेवणे, जास्त काळ वेदनाशामक औषधे खाणे यामुळे किडनी खराब होऊ शकते. 


जर वरील गोष्टींची तुम्ही व्यवस्थित काळजी घेतलीत, तर तुम्हाला तुमची किडनी (Kidney Diseases) निरोगी ठेवता येईल. 


(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)