तळणीच्या उरलेल्या तेलाचा पुन्हा वापर कसा कराल? `हे` आहेत सर्वात उत्तम उपाय
Kitchen Tips In Marathi: एकदा वापरण्यात आलेल्या तेलाचा पुन्हा वापर केल्यास शरिरासाठी हानिकारक ठरू शकते. अशावेळी तेलाचा वापर पुन्हा कसा करता येईल.
Reuse Cooking Oil: भारतात सणासुदीच्या दिवसांत गोडधोड पदार्थांबरोबरच ऑयली फुडही हमखास केले जाते. पुऱ्या, भज्या या सारखे पदार्थ तर हमखास घरी केले जातात. पण तुम्हाला हे माहितीये का तळणीसाठी एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरणे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक असते. अशावेळी तळलेल्या तेलाचे काय करावे अशा प्रश्न पडतो. त्याचा पुन्हा वापर कसा व कधी करावा असे अनेक प्रश्न गृहिणींना पडलेले असतात. तळणासाठी घेतलेले तेल कढईत जास्त उरले ते तर आपण फेकून देऊ शकत नाही. अशावेळी या तेलाचे काय करावे याची माहिती आज आपण घेऊया.
तेल जास्त गरम झाल्यानंतर त्यातून धूर येण्यास सुरुवात होते. म्हणजेच तेल अतिप्रमाणात गरम झाल्यास त्यात एक्रोलीन, एक्रेलामाइड आणि पॉलिसाइक्लिम एरोमेटिक हायड्रोकार्बन तयार होतात. त्यानुळं तेलात अनेक विषारी तत्वे निर्माण होतात. त्यानुळं कॅन्सर आणि हृदयरोगासंबंधित आजार वाढू शकतात. त्यामुळं एकदा तळण्यासाठी वापरलेले तेल पुन्हा गरम करुन वापरु नये, अशा सल्ला डॉक्टर देतात. तसंच, तेल अनेकदा गरम केल्यास शरीरात ऑक्सिडेटिव स्ट्रेस वाढतो. यामुळं शरीरात खतरनाक फ्री रेडिकल वाढतात.लिव्हर, किडणी आणि फुफ्फुसांचे आजार वाढीस लागतात.
उरलेल्या तेलाचे करायचे काय
तळणीचे तेल एकदा वापरल्यानंतर जर थोडेच शिल्लक राहिले असेल तर पोळी भाजताना वर हे तेल लावू शकता. जेणेकरुन तेल पुन्हा गरम न करताही वापरता येईल.
तळणीचे तेल पुन्हा कसं वापराल?
कोणतेही कुकिंग ऑइल फक्त एकदाच तळण्यासाठी वापरावे. जर तुम्हाला पुन्हा तेल वापरायचे असल्यास ते चांगले फिल्टर करणे आवश्यक आहे. जेणेकरुन सर्व जळलेले अन्नाचे कण काढून टाकले जातील.एकदा तळलेले तेल पुन्हा वापरताना केवळ भाजी बनवण्यासाठी वापरा. उच्च तापमानावर तेल पुन्हा वापरणे टाळा.
तळणीसाठी वापरलेले तेल दोन दिवसातच वापरावे.जर तुम्हाला तेल पुन्हा वापरण्या योग्य ठेवायचे असेल तर ते कमी तापमानातच वापरा. जेणेकरून तेलातून धूर निघणार नाही.तेलात पदार्थ तळताना उरलेले कण लगेच काढून टाकावेत. जळल्यानंतर ते कण काळे होणार नाहीत.तळण्यासाठी नेहमी स्टीलचे भांडे वापरावे.लोखंडी भांड्यात तेल टाकून तळण्याचे काम करू नये. अशा तेलात एक विचित्र वास येऊ लागतो आणि ते पुन्हा वापरण्यास योग्य नाही.