Knee Pain Remedies :  गुडघेदुखी अगदी सामान्य समस्या असली तरीदेखली ती खूप असह्य वेदनादायी आहेत. अनेक गोष्टींमुळे तुमच्या गुडघ्यांमध्ये वेदना होतात. ज्यामध्ये वैद्यकीय स्थिती, आघात, सांध्यावर जास्त दबाव किंवा यूरिक ऍसिडची उच्च पातळी यामुळे तुम्हाला गुडघेदुखी होते. कोणत्याही आजाराचे कारण जर आपल्याला कळलं तर त्यावर उपचार करणे सोपे होते. कमी वयातही गुडघेदुखीचा त्रास होत असेल तर सर्वप्रथम रक्त तपासणीसह हाडांची घनता तपासली करायला हवी असं तज्ज्ञ सांगतात. (Knee Pain Remedies drug will help increase the flexibility of the joints fastest way to relieve Knee Pain)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्यतिरिक्त जर तुम्हाला तुमच्या गुडघ्यात कोणत्याही कारणाने दुखत असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. यामुळे तुमच्या गुडघेदुखीपासून आराम तर मिळेलच पण तुम्हाला चालणे किंवा पायऱ्या चढणे देखील कठीण होणार नाही.


सांधे आणि गुडघेदुखी होऊ नये म्हणून 'या' गोष्टींची काळजी घ्या!


1 - गुडघेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी कोल्ड कॉम्प्रेसचा वापर करावा. कोल्ड कॉम्प्रेसमुळे वेदना कमी होण्यास मदत मिळते तर गरम कॉम्प्रेसमुळे वेदना बळावते. त्यामुळे गुडघेदुखीसाठी हॉट कॉम्प्रेस कधीही योग्य नाही. 


2 - याशिवाय दुग्धजन्य पदार्थ जास्त खाणे टाळा कारण हे दुग्धजन्य पदार्थ जसे की चीज, दूध आणि दही जळजळ वाढवते. त्याऐवजी प्लांट बेस कॅल्शियम घेणं हिताच ठरते. 


3 - सकाळी सूर्यप्रकाशात व्हिटॅमिन डी असल्यामुळे जर तुम्हाला सकाळचा सूर्यप्रकाश घ्यावा. त्यामुळे हाडे खूप मजबूत होण्यास मदत मिळते. 


4 - गुडघेदुखीवर निलगिरीचे तेल खूप फायदेशीर मानले जाते. वेदना कमी करण्यासाठी हे तेल खूप प्रभावी असल्याच आयुर्दैवात सांगण्यात आलंय. 


हेसुद्धा वाचा - महिलांनाच नाही तर पुरुषांनाही होऊ शकतं Urine Infection, लक्षण ओळखा अन्यथा किडनी निकामी होण्याची भीती


5 - व्यायाम केल्याने गुडघेदुखीपासून खूप आराम मिळतो. त्यामुळे हलका व्यायाम म्हणजे, पोहणे, सायकलिंग सारखे व्यायाम करावेत. 


6 - याशिवाय वजन वाढणे हे देखील गुडघेदुखीचे एक कारण असतं. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या पायात किंवा गुडघ्यात दुखत असेल तर सर्वप्रथम वजन कमी करणे गरजेचे आहे.


7 - डिहायड्रेशन किंवा शरीरात पाण्याची कमतरता यामुळे वेदनांची समस्या वाढते. त्यामुळे भरपूर पाणी प्या.


(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)