मुंबई : जर तुमच्या शरीराप्रमाणे डाएटिंग केलं तर त्याचा फायदा हा सर्वाधिक असतो. जर तुम्हाला माहित आहे तुमचं शरीर कोणत्या प्रकारचं आहे तर तुम्ही त्या शरीराप्रमाणे डाएट फॉलो करा. हे डाएट तुमच्या शरीरासाठी भरपूर प्रमाणात फायदेशीर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसं पाहायला गेलं तर फिट राहण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी आज सर्रास डाएट फॉलो केलं जातं. पण हेच डाएट जर ब्लड डाएटिंग असेल तर त्याचा परिणाम जास्त चांगला होतो. ब्लड डाएटिंग हे आपल्या प्रत्येकाच्या ब्लड ग्रुपप्रमाणे असतं. याप्रमाणे डाएट केल्यामुळे फक्त तुम्ही फिट राहता असं नाही तर तुमचं वजन देखील लगेच कमी होतं. त्यामुळे डाएट फॉलो करताना कायम ब्लड डाएटिंगचा विचार करा. 


ब्लड ग्रुप O  


ज्यांच ब्लड ग्रुप O असतो त्यांना पोटात ऍसिड सारख्या अल्कालाइन, फोस्फेट, लीपोप्रोटीन याच प्रमाण अधिक असतं. या ऍसिडच्या समस्येमुळे त्यांच्या पचन शक्तीत त्रास होतो. यामुळे गॅस्ट्रिक, अल्सर आणि थायरॉइड सारख्या आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे O ब्लडग्रुप असलेल्या लोकांनी मसालेदार पदार्थ कमी खावेत. आपल्या डाएटमध्ये फळ, फळ भाज्या, डेअरी प्रोडक्ट, चिकन, अंडे, मासे यासारख्या गोष्टींचा समावेश करावा. कॉफी, चॉकलेट आणि मद्यासारखे पदार्थ दूर ठेवावेत. 


ब्लड ग्रुप A 


A ब्लड ग्रुप असलेल्या लोकांना डायबिटीज आणि स्थूलपणा सारख्या समस्या अधिक असतात. कारण यांच्या ग्रुपमध्ये स्टमक अॅसिड कमी असतं म्हणून पचनशक्ती सहज होते आणि यांच्या मेटाबोलिझम देखील उत्तम असतं. A ब्लड ग्रुपमध्ये सेंसेटिव इम्यून सिस्टम असते त्यामुळे या ग्रुपच्या लोकांनी मासे, डाळ, फळ आणि भाज्या खाव्यात. A ब्लड ग्रुपच्या लोकांना मटण, डेअरी पदार्थ यासारख्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला हवे. 


ब्लड ग्रुप B 


B ब्लड ग्रुप असलेल्या लोकांमध्ये कोरिस्टॉलचे प्रमाण अधिक असते. यामुळे जाडेपणा, डायबिटीज आणि इनफ्लेमेटरी सारख्या आजारांमा यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे यांनी कायम प्रोटीनने भरलेले जेवण आणि कम कार्बोहायड्रेट आणि फॅट वाढवणारे पदार्थ खावू नयेत. 


AB ब्लड ग्रुप 


AB ब्लड ग्रुपच्या लोकांमध्ये स्टमक अॅसिड कमी मात्रात असते. यामुळे त्यांना सिक्रिट होतं आणि पाचन शक्तीमध्ये बिघाड होण्याची शक्यता असते. AB ब्लड ग्रुप लोकांच्या डाएटमध्ये सर्वाधिक फ्रेश भाज्या आणि फळ खावीत. थोड्या प्रमाणात सतत पाणी प्यावे. यामध्ये मटण, मसालेदार पदार्थ खावू नयेत.