विवाहित पुरुषांनो झोपण्यापूर्वी बेदाणे खा, मिळतील `हे` फायदे
अनेकांनी बेदाणे (kishmish) खाल्ले असतील. बेदाण्याचा विविध पदार्थात वापर केला जातो. बेदाणे खाण्याचे अनेक फायदे आहेत.
मुंबई : अनेकांनी बेदाणे (kishmish) खाल्ले असतील. बेदाण्याचा विविध पदार्थात वापर केला जातो. बेदाणे खाण्याचे अनेक फायदे आहेत. हिमोग्लोबिन, कोलेस्ट्रॉल आणि हाडांची ताकद या आणि अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांवर बेदाणा फायदेशीर आहे. या व्यतिरिक्त विवाहित पुरुषांसाठी बेदाणा उपयोगी आहे. बेदाण्याचे आरोग्यसाठी काय काय फायदे आहेत, हे आपण जाणून घेणार आहोत. (know kishmish benefits to health stamina blood circulation)
बेदाण्याचं सेवन विवाहित पुरुषांसाठी फायदेशीर
बेदाण्यात आर्जिनिन नावाचा घटक आढळतो. हा घटक शरीरात जाऊन नायट्रो ऑक्साइड निर्माण करतो. यामुळे धमण्या उघडतात तसेच रक्तप्रवाह चांगला होतो. बेदाण्याच्या सेवनामुळे शुक्राणूंची संख्या वाढवते. विवाहित पुरुष दिवसात मूठभर बेदाणे खाऊ शकतात. याशिवाय झोपण्यापूर्वी अर्धा मूठ बेदाणे दुधासोबत खाऊ शकतात. ज्यांना दुधाची ऍलर्जी आहे त्यांनी दुधासोबत मनुका खाऊ नये.
रक्त तयार होण्यासही मदत
बेदाण्यामध्ये लोहाचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे बेदाण्याच्या सेवनामुळे रक्त तयार होण्यासही मदत होते. याशिवाय मनुका मध्ये तांबे देखील चांगल्या प्रमाणात आढळतं, जे शरीरात लाल रक्तपेशी तयार करण्यास मदत करतं.
मनुका खाण्याची योग्य पद्धत?
बहुतेक लोक सामान्य पद्धतीने मनुका खातात. पण मनुके भिजवून खाल्ल्यास त्यातील अँटिऑक्सिडंट्स आणि पोषक तत्वांचे प्रमाण वाढते. मनुके रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी खा. यामुळे तुम्ही आजारांपासूनही वाचाल आणि दिवसभर तुमचा उत्साहही राहील.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आम्ही तुम्हाला विनंती करतो की कोणताही उपाय करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)