मुंबई : सुंठ म्हणजेच सुकलेलं आलं आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. सुकलेल्या आल्याच्या पावडरलाच सुंठ बोललं जातं. सुंठदेखील आल्याप्रमाणेच गरम असते. उन्हाळ्याच्या दिवसांत सुंठेचं कमी, तर थंडीच्या दिवसांत अधिक सेवन फायदेशीर ठरतं. पण सुंठ अतिप्रमाणात घेतल्यास हानिकारक ठरु शकते. 


पोटासंबंधी आजार -


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गॅस, अपचन, अतिसार यांसारख्या इतरही पोटाच्या समस्यांसाठी सुंठेचा उपयोग केला जाऊ शकतो. सुंठेत अॅन्टी-इन्फ्लेमेन्टरी तत्व असतात, जे पोटाच्या समस्या ठिक करण्यासाठी मदत करतात. सुंठेच्या नियमित सेवनाने पचनशक्ती मजबूत होण्यास मदत होते. सुंठेत असणारं अॅन्टी- इन्फ्लेमेन्टरी तत्व हृदयासंबंधी आजारांचा धोकाही कमी करते.


रोगप्रतिकारशक्ती -


रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सुंठ फायदेशीर आहे. थंडीच्या दिवसांत इम्यून सिस्टम कमकुवत होते, परिणामी सर्दी, खोकल्यासारखे आजार होतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सुंठेचा उपयोग करु शकता. खासकरुन थंडीच्या दिवसांत याचं सेवन अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करु शकतं.


नैसर्गिक पेनकिलर -


एका संशोधनानुसार, सुंठ एक नैसर्गिक, नॅच्युरल पेनकिलर असल्याचं सांगण्यात आलं आहे. सुंठेमध्ये दुखणं कमी करण्याचे औषधीय तत्व असतात. अनेकदा महिलांना मासिक पाळीदरम्यान सुंठ असलेला चहा घेण्याचा सल्ला दिला जातो. 


डोकेदुखी - 


डोकेदुखीवरही  सुंठ आराम देते. सुंठेमध्ये अनेक पोषक तत्व असतात. यामुळे रक्ताभिसारण सुरळित होतं. शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं. ऑक्सिजनचं प्रमाण वाढल्याने आणि रक्ताभिसरण सुरळित होत असल्यास डोकेदुखी कमी होऊ शकते.


कोलेस्ट्रोल - 


ड्राय जिंजरमुळे कोलेस्ट्रोल कमी होत असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे. सुंठेमुळे शरीरात कोलेस्ट्रोलचं प्रमाण आणि ब्लड शुगर योग्य प्रमाणात राहते. 


गर्भावस्था - 


एका संशोधनानुसार, गर्भावस्थेमध्ये सुंठेचा फायदा होऊ शकतो. गर्भावस्थेमध्ये गॅस, पोटासंबंधी अनेक समस्या होत असतात. अशावेळी सुंठ पावडर महिलांना पोटाच्या समस्या कमी करण्यासाठी मदत करते. सुंठेमुळे मॉर्निंग सिकनेस कमी होऊ शकतो.


मधुमेह -


आल्यामध्ये असलेले एक्टिव्ह कंपाउड्स इन्सुलिन आणि मेटाबॉलिज्म उत्तम ठेवण्यासाठी मदत करते. यामुळे मधुमेहाचा धोका कमी केला जाऊ शकतो. 


सुंठेचं सर्वाधिक उत्पादन भारत, नायजेरिया, चीन, कॅरेबियन, इंडोनेशियामध्ये  होतं. प्राचीन काळापासून आयुर्वेदिक औषधांमध्ये सुंठेचा उपयोग केला जात आहे.