Cholesterol Levels for your age : आजकाल वाढत्या कोलेस्टरॉलमुळे सर्वजण हैराण आहेत. कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे शरीर अनेक आजारांना आमंत्रण देत असते. आपल्या शरीरात असणारं कोलेस्ट्रॉल (Cholesterol) हे मेणाप्रमाणे एक पदार्थ असतो. कोलेस्ट्रॉल 2 प्रकारची असतात, एक डेंसिटी लिपोप्रोटीन (LDL) आणि दुसरं हाई डेंसिटी लिपोप्रोटीन (HDL). जर तुमच्या रक्तात LDL चं प्रमाण जास्त झालं तर ब्लड आर्टरीजमध्ये फॅट डिपॉझिट वाढतं, ज्याला प्लॅक म्हटलं जातं. आर्टरीजमध्ये प्लॅकच्या समस्येने हार्ट अटॅक तसंच स्ट्रोकचा धोका वाढतो. तर दुसरीकडे रक्तात HDL म्हणजेच गुड कोलेस्ट्रॉल शरीरासाठी उत्तम मानलं जातं. (know the cholestrol level according to your body and age in marathi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉक्टर किंवा तज्ज्ञ मंडळी HDL, LDL आणि टोटल कोलेस्ट्रॉल मोजू शकतात. नॉन-एचडीएल फॅटा स्तर तुम्हाला समजू शकतो. हे घटक हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढवतात. चला तर मग जाणून घेऊया, तुमच्या वयानुसार शरीरातील कोलेस्ट्रॉल लेवल (Cholesterol level) किती असलं पाहिजे


19 वयोगटातील व्यक्तींची कोलेस्ट्रॉल लेवल


मेडिकल न्यूज टुडेच्या रिपोर्टनुसार, 19 वर्षांपर्यंतच्या तरूणांच्या शरीरात कोलेस्ट्रॉल 170mg/dl पेक्षा कमी असलं पाहिजे. याचं non-HDL 120 mg/dl पेक्षा कमी आणि  LDL 100 mg/dl पेक्षा कमी असलं पाहिजे. तर HDL 45 mg/dl पेक्षा जास्त असलं पाहिजे.


20 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील पुरुषांचं कोलेस्ट्रॉल लेवल


20 पेक्षा जास्त वयोगटातील पुरुषांच्या शरीराचं टोटल कोलेस्ट्रॉल 125-200 mg/dl च्या मध्ये असलं पाहिजे. तर दुसरीकडे non-HDL लेवल 130 mg/dl पेक्षा कमी आणि LDL लेवल 100 mg/dl पेक्षा कमी असायला पाहिजे.  HDL लेवल 40 mg/dl किंवा त्यापेक्षा अधिक होणं गरजेचं आहे.


20 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील स्त्रियांचं कोलेस्ट्रॉल लेवल


20 वर्षांपेक्षा जास्त वयातील महिलांच्या शरीरात टोटल कोलेस्ट्रॉल 125–200 mg/dl मध्ये असलं पाहिजे. याशिवाय non-HDL लेवल 130 mg/dl पेक्षा कमी आणि LDL लेवल 100 mg/dl पेक्षा कमी असलं पाहिजे. तर  HDL लेवल 50 mg/dl किंवा त्यापेक्षा अधिक असलं पाहिजे.


तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोलेस्ट्रॉल लेवलचा समतोल राखणं खूप गरजेचं आहे. कारण कोलेस्ट्रॉल लेवल बिघडली तर हृदयाशी संबंधित आजार जडण्याची भीती असते. 


सध्या थंडीचा कडाका वाढलाय, अशात कोलेस्ट्रॉलच प्रमाण देखील वाढू लागत इतकंच काय तर नसांमध्ये असणारं कोलेस्ट्रॉल गोठू लागत.  त्यामुळे काही फळं तुम्हाला यात मदत करू शकतात.


कोलेस्टेरॉल रक्तवाहिन्यांमध्ये (Blood Vessels) जमा होऊन रक्ताभिसरणावर (Blood Circulation) परिणाम करते. त्यामुळे अनेकवेळा रक्त हृदयापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाही. हे हृदयाशी संबंधित अनेक समस्यांचे कारण बनू शकते.


उच्च कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यासाठी आपण आहारात काही बदल केले तर ते नक्कीच फायद्याचे ठरु शकते. काही फळांना आपल्या आहाराचा भाग बनवून कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवता येते. 


सफरचंद, पपई, संत्र, लिंबू, द्राक्ष यासारखी फळं खूप फायदेशीर ठरतात.