मुंबई : बहुतेक जणांना जेवणात उरलेला पदार्थ दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा दुपारी खाण्याची सवय असते. यामध्ये भात नेहमीच आघाडीवर असतो. रात्री उरलेल्या भाताला फोडणी देऊन नाश्त्यात खाल्ला जातो. जास्तच भात शिल्लक राहिला असेल, तर काही जण दुपारच्या जेवणासाठी आहे तोच भात पूरवुन खातात. पण उरलेला भात दुसऱ्या दिवशी खाल्याने तुम्हाला आजारही होऊ शकतो. एकाप्रकारे तुम्ही आदल्या रात्रीचा भात खाऊन रोगांना जणू आमंत्रणच देताय. अशा प्रकारचा भात खाल्ल्याने काय नुकसान होतं, तसेच हा भात खाण्याची योग्य वेळ कोणती, हे आपण जाणून घेऊयात. (know the disadvantges for eat leftover rice at night the next day)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उरलेला भात खायचा की नाही?


अनेक रिपोर्टनुसार, शिल्लक राहिलेल्या भाताचं सेवन हे आरोग्यासाठी नुकसानकारक आहे. Independent च्या एका रिपोर्टमध्ये इंग्लंडच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या आधारानुसार, उरलेला भात खाणं हे आरोग्याासाठी योग्य नाही. त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी तुम्हीही उरलेला भात खाण्याचा मोह टाळा. या रिपोर्टनुसार, उरलेल्या भातामुळे विषबाधाही होऊ शकते.


भातामुळे काय दुष्परिणाम?


या  रिपोर्टनुसार, अर्ध शिजलेल्या भातात काही जीवाणू असतात. तांदूळ शिजवताना ते जीवाणू त्यात असतात. पण हे जीवाणू आरोग्यासाठी धोकादायक नसतात. पण तांदूळ शिजवल्यानंतर भात बऱ्याच वेळ ठेवल्यानंतर त्या भातातील जीवाणूंच रुपांतर हे बॅक्टेरियात होतं. हे बॅक्टेरिया पोटात गेल्याने फूड पॉईजन होऊ शकतं. त्यामुळे उरलेला भात खाणं टाळावं.  


किती वेळात भात खायला हवा?


तांदूळ शिजवल्यानंतरच्या पुढील 2 तासात भात खायला हवा. भात बनवल्या बनवल्या तुम्ही खाणार नसाल, तर भाताचा टोप नीट फ्रीजमध्ये ठेवावा. फ्रीजमधील भात काही वेळेनंतर तुम्ही खाऊ शकता. फ्रीजमध्ये 2 तासांपेक्षा अधिक वेळ ठेवलेला भात खाणं आरोग्यासाठी धोकादायक आहे.