मुंबई : उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. घराबाहेर पडल्यावर उन्हाच्या झळा जाणवू लागतात. अशा दिवसांत आपल्या सर्वांचा कल थंड पेय पिण्याकडे असतो. मात्र थंड कोल्डड्रिंक पिण्यापेक्षा कैरीचं पन्ह हा एक उत्तम पर्याय आहे. कैरीच्या पन्ह्याचं सेवन उन्हाळ्याच्या दिवसांत खूप फायदेशीर मानलं जातं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मार्केटमध्ये कैरीचं पन्हं सहजतेने उपलब्ध असतं, पण तुम्ही हे पन्हं घरच्या घरी देखील बनवू शकता. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराचं तापमान स्थिर ठेवण्यासाठी कैरीचं पन्ह मदत करतं. तर जाणून घेऊया घरच्या घरी कैरीचं पन्हं कसं तयार करावं.


कैरीचं पन्ह तयार करण्यासाठी लागणारी सामुग्री


  • 2-3 मध्यम आकाराच्या कैऱ्या

  • 2 छोटे चमचे जीऱ्याची पूड

  • 1/4 काळी मिरी

  • 100- 150 ग्राम साखर

  • 3 चमचे पुदीना

  • स्वादाप्रमाणे काळं मीठ


कैरीचं पन्हं बनवण्याची रेसिपी


  • कैरीचं पन्ह बनवण्यासाठी आंबा धुवून एका भांड्यात उकळण्यासाठी ठेवा.

  • तुम्हाला हवं असल्यास कुकरमध्ये किंवा कोणत्याही दुसऱ्या भांड्यात कैरी ठेवू शकता.

  • पन्हं बनवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे कैरी धुवून सोलून त्यातील गर देखील काढता येतो.

  • आता यामध्ये 1-2 कप पाणी घालून उकळण्यासाठी ठेवा.

  • हा गर थंड झाल्यावर साखर, काळं मीठ आणि पुदिन्याची पानं मिक्सरमध्ये टाकून बारीक करा.

  • आता या पल्पमध्ये साधारण 1 लिटर थंड पाणी घाला.

  • हे मिश्रण गाळून त्यात काळी मिरी, जिरं पावडर टाका.

  • यामध्ये बर्फाचे तुकडे घालून सर्व्ह करा.

  • हे पन्हं पुदिन्याच्या पानांनी सजवून सर्व्ह करा.

  • हे पन्हं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून 3-4 दिवस वापरू शकता.