मुंबई : कोरोनानंतर घरातून काम करण्याचा ट्रेंड वाढला आहे. त्यामुळे प्रत्येकजण घरून काम करत आहेत. ज्यामुळे लॅपटॉपचा वापर देखील चांगलाच वाढला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की, लॅपटॉपचा अतिवापर करणं तुमच्या प्रजननावर परिणाम करू शकतं. हो हे खरं आहे दिवसभर लॅपटॉप वापरल्याने शरीरावर वाईट परिणाम होतो. लॅपटॉपमधून निघणाऱ्या उष्णतेमुळे आपली त्वचा आणि अंतर्गत ऊतींचे नुकसान होऊ शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बऱ्याच लोकांना अशी सवय असते की, ते आपल्या पायावर लॅपटोप घेऊन बसतात. तुम्हाला देखील अशी सवय असेल, तर ती आताच बदला. कारण जास्त वेळ मांडीवर लॅपटॉप ठेवल्याने पुरुषांमध्ये वंध्यत्वाची समस्या उद्भवू शकते.


त्याच बरोबर हे देखील लक्षात घ्या की, लॅपटॉपपेक्षा जास्त नुकसान त्याच्याशी जोडलेल्या वायफाय मुळे होते, कारण रेडिएशन हे इंटरनेट कनेक्शनशी संबंधित आहे.


चला तर मग जाणून घेऊ या लॅपटॉप घेऊन काम करण्याचे तोटे.


लॅपटॉपच्या उष्णतेमुळे महिलांपेक्षा पुरुषांचे जास्त नुकसान होऊ शकते. याचे कारण म्हणजे शरीराची घडना. म्हणजेच स्त्रियांमध्ये, गर्भाशय त्यांच्या शरीराच्या आत असते, तर पुरुषांमध्ये, अंडकोष शरीराच्या बाहेर स्थित असतो, ज्यामुळे त्याच्या उष्णतेचा तसेच रेडिएशनचा परिणाम पुरुषांवर जास्त होतो. त्यामुळे पुरुषांनी लॅपटॉप वापरताना विशेष काळजी घ्यावी.


उच्च तापमानामुळे शुक्राणूंची गुणवत्ता घसरत असल्याने प्रजननक्षमतेमध्ये समस्या उद्भवू शकतात.


वायफायद्वारे रेडिएशन पसरते


लॅपटॉपवर दीर्घकाळ काम करण्यापेक्षा हे वाईट आहे. जेव्हा तुम्ही लॅपटॉप स्वतःच्या पायावर ठेवून वापरता. तेव्हा हार्ड ड्राईव्हमधून कमी फ्रिक्वेंसी रेडिएशन उत्सर्जित होते, तर ब्लूटूथ कनेक्शनमधून तेच रेडिएशन बाहेर येते. रेडिएशनच्या प्रभावामुळे तुम्हाला निद्रानाश, तीव्र डोकेदुखी यासारख्या समस्या उद्भवू शकतात.


स्नायू दुखणे उद्भवू शकते


लॅपटॉप पायावर किंवा मांडीवर ठेवण्याऐवजी ते टेबलावर ठेवून त्याचा वापर करा. काही लोक लॅपटॉप वापरताना पाय चिकटवून बसतात, त्यामुळे लॅपटॉपचे रेडिएशन थेट शरीरावर पडतात.


उपकरणातून निघणारी उष्णता तुम्हाला आजारी बनवू शकते. सतत लॅपटॉप वापरणे टाळा. यामुळे आपल्या स्नायूंमध्ये वेदना होऊ शकतात.