उशीरा नाश्ता किंवा जेवण करताय, आत्ताच सावध व्हा! हृदयविकाराचा धोका वाढतो
Heart Attack Risk: हृदयविकाराचा झटका किंवा हृदयासंबंधित आजारांचे प्रमाण हल्ली वाढत जाताना दिसतेय. मात्र, त्याचे नेमके कारण एका संशोधनात समोर आले आहे.
Heart Attack Risk: हृदयविकाराच्या झटका किंवा हृदयरोगासंबंधीत आजारांचा धोका वाढताना दिसत आहे. व्यायामाचा अभाव आणि ताण-तणाव यामुळं हृदयरोगाचा धोका वाढताना दिसत आहे. मात्र याबरोबरच वेळ-अवेळी जेवणे हेदेखील एक हृदयविकारासाठी कारणीभूत आहे. अलीकडेच करण्यात आलेल्या एका अभ्यासात नाश्ता आणि रात्रीचे जेवण यात होणाऱ्या चुकांमुळं हृदयविकाराचा धोका वाढतो. हे संशोधन नेचर कम्युनिकेशन जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. यात एक लाखाहून अधिक लोकांच्या डाएट आणि आरोग्याबाबत सात वर्षांपर्यंत अभ्यास करण्यात आला आहे.
संशोधनात उघड झाले आहे की, दोन हजाराहून अधिक जणांना हृदयासंबंधित आजाराने ग्रस्त आहेत. या संशोधनानुसार, नाश्ता उशीरा करण्याने हृदयासंबंधीत आजार आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. तर, स्ट्रोकचा धोका 6 टक्क्यांनी वाढतो. रात्रीच्या जेवणाचाही हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो. संशोधनात असे आढळून आले आहे की रात्री 9 नंतर जेवल्याने स्ट्रोक किंवा ट्रान्झिएंट इस्केमिक अटॅक (TIA) चा धोका 28% वाढतो. याशी संबंधित कारण असे मानले जाते की आपली जेवणाचे पचन होण्यास विलंब होतो. त्यामुळं त्याचा परिणाम रक्तातील साखर आणि रक्तदाबावर होतो.
संध्याकाळच्या वेळी रक्तदाब वाढल्यास रक्तवाहिन्यांना दीर्घकालीन नुकसान पोहोचू शकतो, ज्यामुळे रक्ताच्या गुठळ्या, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक यासारखे गंभीर आजार होण्याची शक्यता असते. तथापि, या विषयावर आणखी संशोधनाची गरज आहे, असंही म्हणण्यात येते. संशोधनात असेही आढळून आले आहे की, रात्री 9 नंतर जेवण केल्यास गंभीर हृदयविकाराचा धोका वाढत नाही. तथापि, रात्रीच्या जेवणास उशीर केल्यास स्ट्रोक किंवा टीआयएचा धोका 8% वाढतो. अभ्यासात महिलांवर विशेष प्रभाव आढळून आला, पुरुषांमध्ये कमी लक्षणीय परिणाम दिसून आले. दरम्यान, परंतु नाश्ता उशीरा केल्यास गंभीर हृदयविकाराचा धोका 11% वाढला असल्याचे संशोधनात आढळले आहे.
दरम्यान, रात्रभर उपवास केल्यासआरोग्याला फायदेदेखील होऊ शकतात. उपवासामुळे स्ट्रोकचा धोका 7% कमी होतो. हृदयविकारांना दूर ठेवण्यासाठी केवळ सकस आहाराबरोबर खाण्याच्या वेळेचेही भान ठेवा, असे हे संशोधनात सांगण्यात आले आहे. सकाळचा नाश्ता लवकर करा आणि रात्री लवकर जेवण करा जेणेकरून तुमचे शरीर योग्यरित्या कार्य करेल आणि निरोगी राहील.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)