स्ट्रोकच्या रुग्णांना व्हर्च्युअल थेरपीचा आधार, जाणून घ्या
सर्वाधिक दुर्धर आणि मृत्यूचे सर्वाधिक प्रमाणात आढळणारे कारण ठरणारा आजार
मुंबई: कोविड-१९ विरोधातील भारताची लढाई आजही सुरू असताना स्ट्रोकसारख्या दुर्धर आणि गंभीर आजारांच्या रुग्णांना अगणित समस्यांचा सामना करावा लागत आहे. कोविड-१९ मुळे आलेल्या निर्बंधांमुळे स्ट्रोकच्या म्हणजे पक्षाघाताच्या रुग्णांना पुनर्वसन केंद्राला नियमितपणे भेट देणे आणि/किंवा घरच्या घरी नियमित थेरपी घेणे या गोष्टी पुढे ढकलणे भाग पडत आहे.
स्ट्रोक हा आजार आता कोरोनरी आर्टरी डिजिझ (CAD) नंतरचा प्रौढांमध्ये आढळणारा सर्वाधिक दुर्धर आजार आणि मृत्यूचे सर्वाधिक प्रमाणात आढळणारे कारण ठरणारा आजार म्हणून ओळखला जात आहे. गेल्या दशकामध्ये भारतासह इतर निम्न आणि मध्यम उत्पन्नगटातील रुग्णांमध्ये स्ट्रोकच्या घटना दुपटीने वाढल्या.
त्यात आपल्या देशामध्ये प्रती रुग्ण उपलब्ध फिजिओथेरपी तज्ज्ञांचे प्रमाण सर्वात चिंताजनक आहे. प्रत्येक ८० लाख विद्यमान रुग्ण आणि १० लाख नवीन रुग्णांमागे (दरवर्षी) उपलब्ध फिजिओथेरपिस्ट आणि व्यावसायिक थेरपिस्ट्सची एकूण संख्या फक्त ३५,००० आहे.
पक्षाघातामुळे हालाचालींवर येणाऱ्या मर्यादांमुळे पूर्ववत होण्यासाठीचे व्यायामोपचार मिळविणे हे रुग्णांसाठी, विशेषत: वयोवृद्ध रुग्णांसाठी नेहमीच एक आव्हान राहिले आहे.
अशात लॉकडाऊनमध्ये झालेली वाढ हा त्यांच्या बरे होणा-या प्रवासातील एक मोठा अडथळा ठरत आहे कारण या काळात सुरक्षिततेच्या कारणामुळे रुग्णांना थेरपी घेण्यासाठी ना घराबाहेर पडू शकत ना थेरपिस्टला घरी बोलावू शकत. विशेषत: वयोवृद्ध रुग्णांना केवळ हालचाली सुधारण्यासाठीच नव्हे तर परिस्थिती आणखी खालावू नये यासाठीही दररोज थेरपी घेणे आवश्यक असते.
SynPhNe या जगातील पहिल्या कनेक्टेड, वेअरेबल तंत्रज्ञान उपाययोजना तयार करणाऱ्या डिजिटल न्यूरोलॉजिकल थेरॅप्युटिकल कंपनीने स्ट्रोकच्या रुग्णांसाठी व्हर्च्युअल मंचांच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणारी आणि न्यूरोफिजिओथेरपी तज्ज्ञांच्या नेतृत्वाखाली चालणारी ऑनलाइन थेरपी सेशन्स सुरू केली आहेत.
व्हर्च्युअल थेरपी सेशन्सचा हा पर्याय स्वीकारणा-या रुग्णांपैकी ६०% अधिक रुग्ण हे ज्येष्ठ नागरिक आहेत. वयस्कर मंडळी अशाप्रकारचे तंत्रज्ञान लाभदायी वाटल्यास त्याचा खुलेपणाने स्वीकार करण्यास तयार आहेत असे या आकडेवारीतून दिसून येते.
'एप्रिल २०२० पासून सुरू झालेल्या व्हर्च्युअल थेरपी सत्रांना लॉकडाऊन १.० च्या काळात लक्षणीय प्रतिसाद मिळाला आहे. आमच्या विशिष्ट नियमांनुसार राबवली जाणारी व वॉर्मअप व्यायाम आणि दैनंदिन कामे यांचा समावेश असलेल्या या सेशन्समधील सूचना वैयक्तिकरित्या किंवा केअरगिव्हर्सच्या मदतीने अंमलात आणता येतात' असे SynPhNe इंडियाचे डायरेक्टर आणि सीईओ अभिजीत पंडित यांनी सांगितली.
''आमच्या व्हर्च्युअल सेशन्ससाठी नाव नोंदविणा-या रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण हे ज्येष्ठ नागरिक आहेत या गोष्टीचा आम्हाला आनंद आहे. हे रुग्ण नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार काहीशा धीमेपणानेच करतील अशी आमची अपेक्षा होती, मात्र त्यांना अतिशय वेगाने हे तंत्रज्ञान आपलेसे करताना पाहणे अतिशय भारावून टाकणारे असल्याचे पंडीत म्हणाले.
कंपनीचे डिजिटल न्यूरोथेराप्युटिक डिव्हाइस एका अशा तंत्रज्ञानावर चालते, जे स्ट्रोक, ट्रॉमॅटिक ब्रेन इंज्युरी किंवा मोठ्या आघातामुळे मेंदूला झालेली दुखापत, पार्किन्सन्स आणि लर्निंग डिसॅबिलिटी किंवा आकलन क्षमतेतील दोष अशा आजारांमुळे येणाऱ्या शारीरिक अपंगत्वाशी झगडणाऱ्या व्यक्तींना हालचाली आणि ज्ञानेंद्रियांच्या वापरासंबंधी अधिक स्वातंत्र्य मिळावे यासाठी मदत करते.
हा लॉकडाऊन उठतानासुद्धा वयोवृद्ध रुग्ण सावधगिरी बाळगतील आणि ऑनलाइन थेरपीचा पर्याय स्वीकारतील अशी शक्यता आहे. घराबाहेर पडण्यासाठी तयार असणाऱ्या स्ट्रोकच्या रुग्णांना कंपनीच्या केअर सेंटर्समध्येही थेरपीची सोय उपलब्ध आहे.