मुंबई : हिवाळा येताच डास खूप वाढतात आणि डेंग्यू-मलेरियासारखे मोठ्या आजारांचा धोका वाढतो. डासांना दूर करण्यासाठी, लोक बाजारात उपलब्ध असलेल्या रसायनयुक्त उत्पादनांचा वापर करतात. ही उत्पादनं मानवी शरीरासाठी अत्यंत धोकादायक आहेत. त्या सगळ्या गोष्टींच्या धुराचा फुफ्फुसावर आणि श्वसन नलीकेवरही वाईट परिणाम होतो. तज्ञांच्या माहितीनुसार, इसेंसियल ऑइल या सगळ्या उत्पादनांच्या जागी वापरायला हवे. याने तुमची डासांची समस्या दुर होईल. यासोबतच शरीराला इतरही अनेक फायदे होतील. (Use of Essential Oil)


कोणत्या Essential Oil चा वापर करायला हवा?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. आम्ही या यादीत पहिल्या क्रमांकावर लेमनग्रास तेल ठेवले आहे. लेमनग्रासचा उपयोग अनेक रोगांवर औषध म्हणून केला जातो. बाजारात तुम्हाला लेमनग्रास तेल सहज मिळेल. ते अंगावर लावल्याने डास पळून जातात. आपण ते घरात देखील शिंपडू शकता.


हेही वाचा : Turmeric Water: सुटलेल पोट कमी करायचंय, सकाळी रिकाम्या पोटी प्या 'हे' पाणी


2. तुळशीच्या तेलात अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म आढळतात. डासांना घालवण्यासाठी तुम्ही तुळशीचे तेलही वापरू शकता. डास त्याच्या वासापासून दूर राहतात. रात्री झोपण्यापूर्वी अंगावर लावा, हे केल्याने डास चावत नाहीत. याच्या तेलाने मसाज केल्याने त्वचेशी संबंधित अनेक समस्यांपासून सुटका मिळते.


3. लॅव्हेंडरच्या सुगंधापासून कीटक दूर पळतात. मच्छर देखील लॅव्हेंडर तेलानं लांब राहतात. तुम्ही ते घरी शिंपडू शकता. एवढंच काय तर ते तुम्ही अंगावरही लावू शकता. लॅव्हेंडर नैराश्य आणि चिंता यांसारख्या अनेक आजारांपासून आराम देते. तसेच स्नायूंच्या दुखण्यापासून आराम मिळतो.


(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)