नवी दिल्ली : रात्री झोपण्यापूर्वी अनेकजण सकाळी लवकर उठून व्यायाम करण्याचा विचार करतात. मात्र सकाळी लवकर उठणे शक्य होत नाही. आपल्या धकाधकीच्या आणि गुंतागुंतीच्या जीवनशैलीचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. त्यामुळे या धावपळीतून स्वतःसाठी वेळ काढणे गरजेचे आहे. तर आपल्या जीवनशैलीत काही लहान सहान बदल केल्यास तुम्हाला निरोगी दीर्घाष्युष लाभेल. पाहुया काय आहेत ते बदल...


शारीरिक हालचाली बंद करु नका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाढत्या वयानुसार अवयवांचे काम करणे काहीसे मंदावते. पण तुम्ही थांबू नका. हालचाल, काम करणे बंद करु नका. जिने चढा. चाला, फिरा. असा काहीना काहीतरी शारीरिक हालचाली चालू राहू द्या. त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होईल. 


वजन नियंत्रित ठेवा


सात्विक, संतुलित आहार घ्या. त्यामुळे वजन गरजेपेक्षा अधिक वाढणार नाही. आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे यांचा समावेश करा. मासांहारी पदार्थ तुम्हाला आवडत असतील तर जरूर खा. पण त्याचा अतिरेक टाळा. त्याचबरोबर दूध, अंडी अवश्य खा. त्यामुळे शरीराला प्रोटीन्स भरपूर प्रमाणात मिळतील. अशा संतुलित आहाराने शरीराचे वजन नियंत्रित राहिल.


आनंदी रहा


घरी किंवा ऑफिसमध्ये नेहमी गंभीर राहणे गरजेचे नाही. तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत, मित्रमंडळींसोबत हसत खेळत राहू शकता. त्यामुळे तुमचे शरीर-मन रिलॉक्स होईल. थकवा दूर होईल आणि तुम्ही प्रसन्न रहाल.


भावना शेअर करा


भावभावना, अनुभव शेअर केल्याने मन मोकळे होते. भावना, विचारांचे आदान प्रदान झाल्याने नवीन काही शिकायला मिळते.