सेक्स लाइफला आनंदी बनवतील असे प्रोडक्ट; बेडरूमचं वातावरण होईल रोमॅंटिक
लैगिंक आरोग्याची समस्या असल्यास लोक खुलेपणाने बोलत नाहीत. एवढेच नाही तर डॉक्टरांकडे जाण्यासही लोकं धजावत नाही.
नवी दिल्ली : लैगिंक आरोग्याची समस्या असल्यास लोक खुलेपणाने बोलत नाहीत. एवढेच नाही तर डॉक्टरांकडे जाण्यासही लोकं धजावत नाही. परंतू तुम्हाला माहितीये का की तुमची सेक्स लाईफ आनंदी बनवण्यासाठी एक्सपर्ट्सने नुकतीच काही प्रोडक्ट्सची लिस्ट बनवली आहे. हे प्रोडक्ट्स गरज पडल्यास तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये ठेऊ शकता.
स्पर्म चेक मेल फर्टिलिटी टेस्ट
जसे महिलांना घरीच कळते की, ते प्रेग्नंट आहेत की नाही. तसेच पुरूषांची फर्टिलिटी आपण घरीच टेस्ट करू शकतो. या मशीनबाबत दावा करण्यात आला आहे की, ही क्लिनिकमध्ये करण्यात येणाऱ्या टेस्ट प्रमाणेच परिणाम दर्शवते. मशीनचे मीटर फक्त शुक्राणूमध्ये आढळणारे प्रोटीनचा शोध घेण्याचे काम करते. हे मशीन फर्टिलिटी टेस्ट करण्यासाठी डॉक्टरकडे जाण्यास धजावू न शकणाऱ्या लोकांसाठी फायद्याची ठरू शकते.
पुरूषांमध्ये सेक्स इच्छा वाढवण्याचे कॅप्सुल
कंपनीचा दावा आहे की, मेल बुस्ट नावाचे कॅप्सुल जिनसेंग आणि मॅका सारख्या औषधांनी बनले आहे. विटामिन ई आणि जिंकयुक्त आहे. कॅप्सुलमुळे नॅच्युरली टेस्टोस्टेरोन बुस्ट करण्याचा दावा करण्यात येतो.
महिलांची फर्टिलिटी टेस्ट
घरी याद्वारे महिलांच्या 'हार्मोन एमओटी' टेस्ट एका बोटातून रक्त घेऊन सहजपणे करू शकतो. या रक्ताच्या सॅम्पलला लॅबमध्ये पाठवून एस्ट्रोजन, टेस्टोस्टेरोन, फोलिक हार्मोनल आणि थायरॉयड फंक्शनचा रिपोर्ट घेऊ शकतो.
सेक्स ड्राइव सप्लीमेंट
कंपनीचा दावा आहे की, डॅमियाना, मॅका, जिनसेंग, अद्रक आणि रोडियोयुक्त सप्लीमेंट विटामिन B3 आणि अमीनो ऍसिडचे मिश्रण आहे. जे महिलांच्या सेक्स ड्राइवला बुस्ट करण्यास मदत करीत आहेत.
एक्सपर्टसुद्धा त्याचे सेवन करण्याला सुरक्षित मानतात. याशिवाय तुम्ही बेडरूममध्ये प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन स्प्रे, पेल्विक फ्लोर एक्सरसाइजर, फर्टिलिटी ट्रॅकर ऍप, गर्भनिरोधक, गोळ्या कंडोम आणि ल्यूब्रिकेंट ठेऊ शकतात.
अशा प्रोडक्ट्सने रोमॅंटिक लाइफला स्पाइसी बनवण्यात मदत होऊ शकते.