Liver disease symptoms: यकृत खराब झाल्यावर तुमच्या पायांमध्ये दिसून येतात `हे` बदल; वेळीच लक्षणं ओळखा
लिव्हर डॅमेज झाल्याची चिन्ह रूग्णाला त्याच्या पायांमध्ये दिसून येऊ लागतात. जर तुमच्या पायातही खाली दिलेली चिन्ह दिसून येत असतील तर तातडीने डॅाक्टरांची मदत घेणं गरजेचं आहे. जाणून घेऊया लिव्हर डॅमेज होण्याची कोणती लक्षणं पायांमध्ये दिसून येतात.
Liver disease symptoms: यकृत म्हणजेच लिव्हर (Liver Problem) हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव (Main Organ) मानला जातो. गेल्या काही दिवसांमध्ये लिव्हरच्या समस्येने ग्रस्त असलेल्या रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. लिव्हर खराब म्हणजेच डॅमेज (Damage Liver) होण्यामागे अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. यामध्ये एक दिलासादायक गोष्ट म्हणजे, यासंबंधी झालेले आजार उपचारांच्या माध्यमातून बरे करता येतात.
लिव्हरसंदर्भात काहीही समस्या उद्भवली तर त्यावर उपचार घेण्यासाठी त्याचे संकेत समजणं गरजेचं आहे. लिव्हर डॅमेज झाल्याची चिन्ह रूग्णाला त्याच्या पायांमध्ये दिसून येऊ लागतात. जर तुमच्या पायातही खाली दिलेली चिन्ह दिसून येत असतील तर तातडीने डॅाक्टरांची मदत घेणं गरजेचं आहे. जाणून घेऊया लिव्हर डॅमेज होण्याची कोणती लक्षणं पायांमध्ये दिसून येतात.
सूज येणं
तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, जर पायांना किंवा तळव्यांना सूज आली असेल तर हे लिव्हरसंबंधी काही समस्या असण्याचं कारण असू शकतं. जसं की हेपेटायटिस बी, हेपेटायटिस सी, लिव्हर सिरोसिस किंवा फॅटी लिव्हर. हेपेटायटिस बी, हेपेटायटिस सी यामुळे रूग्णाला कॅन्सर होण्याचा धोका अधिक असतो, त्यामुळे पायांमध्ये अशी लक्षणं दिसल्यास तातडीने डॅाक्टरांचा सल्ला घ्या.
पायाच्या तळव्याला सतत खाज येणं
हेपेटायटिसची समस्या बळावली की काही रूग्णांच्या हातांच्या आणि पायांच्या तळव्याला खाज येण्याची समस्या निर्माण होते. हे pruritus नावाच्या समस्येमुळे होतं. ज्यामुळे तुमच्या त्वचेला खाज सुटू लागते. pruritus शिवाय लिव्हरच्या आजारांमुळे हात आणि पायांच्या त्वचा सुकते आणि अशावेळी रूग्णाला सतत खाज येण्याची समस्या बळावते.
पायाचे तळवे दुखणं
लिव्हरसंदर्भातील आजारांमुळे पायांच्या तळव्यांना खाज येण्याची समस्या उद्भवते. ज्यावेळी लिव्हर योग्य पद्धतीने काम करत नाही, त्यावेळी इडिमामध्ये फ्लूइड जमा होण्यास सुरुवात होते. यामुळे पायामध्ये खासकरून पायाच्या तळव्यांमध्ये रूग्णाला वेदना जाणवतात.
पाय सुन्न होणं
हेपेटायटिस सीचा संसर्ग किंवा अल्कोहोलिक लिव्हरच्या समस्येने ग्रस्त असलेल्या लोकांना पाय सुन्न किंवा मुंग्या येण्याची समस्या सतावते. या दोन्ही समस्या डायबेटीजच्या रूग्णांमध्ये दिसून येतात. लिव्हरच्या समस्येने ग्रस्त असलेल्या रूग्णांमध्ये ही गोष्ट सामान्यपणे आढळून येते. यामुळे मेंदू आणि काही नसांना नुकसान पोहोचतं.