मुंबई : डोळे हा आपल्या शरीरातील अत्यंत नाजूक आणि महत्त्वाचा अवयव आहे. त्याशिवाय आपले जीवन म्हणजे अंधःकार. म्हणून डोळ्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. तसंच आपल्या जीवनशैलीमुळे आपण अधिक वेळ कॉम्प्यूटर किंवा मोबाईलसमोर असतो. त्यामुळे डोळ्यांवर विपरीत परिणाम होऊ लागतो. म्हणूनच डोळ्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- 'व्हिटॅमिन ए' आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे गाजर, हिरव्या पालेभाज्या, पपईचा आहारात समावेश करा.
-खजूर, संत्रे, टोमॅटो, बदाम हे पदार्थ अवश्य खावेत. 
- त्याचबरोबर मानसिक तणावही कमी करा.
- मध आणि एक चमचा वेलची पूड एकत्र करून ते मिश्रण खा.
- आयुर्वेदानुसार, लसूण आणि आवळा डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठऱतो.
- दृष्टी सुधारण्यासाठी पायांच्या तळव्यांना थोडेसे तूप लावा.