मुंबई : रोजच्या कामाच्या व्यापामध्ये आपलं आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. यावेळी योग्यवेळी चांगला आहार न घेतल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. यामध्ये ब्लड शुगर, बीपीचा त्रास तसंच हृदयाच्या समस्यांची तक्रार वाढते. मुख्य म्हणजे या सर्वांमध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण फार महत्त्वाचं असून तो एक उपयुक्त घटक मानला जातो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हार्ट अटॅक येण्यामागे महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे कोलेस्टेरॉल. ज्यावेळी कोलेस्टेरॉल तुमच्या रक्ताच्या माध्यमातून रक्त प्रवाहात येतं तेव्हा आजार उद्भवण्याची शक्यता असते. 


वाढलेल्या कोलेस्टेरॉलची लक्षणं


द अमेरिकन अकॅडेमी ऑफ डेर्मेटोलॉजी असोसिएशननुसार, काही प्रमाणात तुमची त्वचा तुमच्या शरीरात वाढलेल्या कोलेस्टेरॉलचे संकेत देत असते.


हात, कोपर आणि पायांवर दिसतात लक्षणं


वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे तुमच्या त्वचेवर छोटे- नरम पिवळे किंवा लाल रंगाचे पुरळ उठतात. त्याचप्रमाणे कोपर, गुडघे, हात, पायांचे तळवे आणि इतकंच नाही तर नाकावरही आढळतात. काही वेळा पिंपल्स किंवा चेहऱ्यावर येणाऱ्या पुळ्यांसारखे वाटल्याने या लक्षणांकडे दुर्लक्ष होतं. मात्र कोलेस्टेरॉल वाढल्यानंतर या पुळ्यांचा आकार मोठा होतो. अनेकवेळा त्यांच्यामुळे कोणतीही वेदना जाणवत नाही.


शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात कशी ठेवावी?


कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यासाठी तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईलमध्ये काही बदल करावे लागतील. यामध्ये-


  • हेल्दी फॅट असलेल्या अन्नाचा आहारात समावेश करावा

  • प्रक्रिया केलेले अन्न खाणं टाळा

  • आहारात साखरेचं प्रमाण कमी करा

  • दररोज वर्कआऊट करा

  • ग्रीन टी प्या

  • प्रोटीनचं सेवन वाढवा