नवी दिल्ली :  आरोग्य मंत्रालयाकडून कोरोना लक्षणांमध्ये आणखी काही संभाव्य लक्षणांचा समावेश करण्यात आला आहे. वास घेण्याची, चव घेण्याची शक्ती अचानक नष्ट होणं या लक्षणांचा कोरोनाच्या नव्या लक्षणांमध्ये समावेश करण्यात आला आहे. तोंडाची चव जाणं, कोणत्याही प्रकारचा वास, गंध न येणं ही कोरोनाची नवी लक्षणं असल्याचं सांगण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका विशेषज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, ही लक्षणं विशेषत: कोरोना संबंधित नाहीत. कारण फ्लू, ताप किंवा इन्फ्लूएन्झामुळेही (शीतज्वर) व्यक्तीची वास किंवा चव घेण्याची क्षमता बिघडते. परंतु ही कोरोनाची प्राथमिक लक्षणं असू शकतात. ही लक्षणं आढळल्यास त्यानुसार, त्वरीत उपचार करण्यासाठी मदत होऊ शकते.



राज्य सरकारचा मोठा निर्णय; कोरोना टेस्ट अवघ्या २२०० रुपयांत


कोरडा खोकला, ताप, श्वसनविषयक समस्या, अशी कोरोना व्हायरसची सुरुवातीची लक्षणं आहेत. त्याशिवाय सांधेदुखी, तीव्र डोकेदुखी, घसा सुजणं, घशाला सूज येणं, घसा खवखवणं, अतिसार, धाप लागणे, कफ, थकवा येणं ही देखील कोरोनाची लक्षण असू शकतात.