Chandra Grahan 2023 : 2023 मधील शेवटचे चंद्रग्रहण आज 28 ऑक्टोबर रोजी होणार आहे. हे ग्रहण रात्री 11:30 वाजता सुरू होईल आणि 3:56 वाजता संपेल. ही एक खगोलशास्त्रीय घटना आहे, ज्यामध्ये चंद्र, त्याच्या अक्षावर फिरत असताना, पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये येतो. धार्मिक मान्यतांनुसार चंद्रग्रहणाच्या काळात काही खबरदारी घ्यायला हवी. असे मानले जाते की चंद्रग्रहणाचा माणसाच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. जाणून घेऊया चंद्रग्रहणाचा शरीराच्या कोणत्या भागांवर विपरीत परिणाम होतो?


चंद्रग्रहाची वेळ (Lunar Eclipse Time)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतातील चंद्रग्रहण 29 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 01.06 वाजता सुरू होईल आणि 02.22 वाजता समाप्त होईल. चंद्रग्रहणाच्या ९ तास आधी सुतक कालावधी सुरू होतो. अशा स्थितीत कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच २८ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी २.५२ पासून सुतक सुरू होईल, जे ग्रहण संपल्यानंतरच संपेल.


डोळ्यांना इजा होऊ शकते


असे मानले जाते की चंद्रग्रहणाचा आपल्या डोळ्यांवर सर्वात जास्त प्रभाव पडतो. ग्रहणाच्या वेळी चंद्राची किरणे अपवित्र होतात. या काळात ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहिल्यास रेटिनाला नुकसान होऊ शकते. यामुळेच ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहण्यास मनाई आहे.


गर्भवती महिलांनी खबरदारी घ्यावी


  • धार्मिक मान्यतांनुसार असे मानले जाते की चंद्रग्रहण काळात गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये. ग्रहण काळात उत्सर्जित होणाऱ्या अतिनील किरणांचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. यामुळे गर्भातील बाळाला इजा होऊ शकते.

  • कोणत्याही गरोदर महिलेने चंद्रग्रहण पाहणे टाळावे आणि त्या काळात घराबाहेर पडू नये.

  • विशेषत: गर्भवती महिलांनी ग्रहणाची किरणे किंवा प्रकाश नसलेल्या ठिकाणी घरामध्येच राहावे.

  • जर तुम्ही गरोदर असाल आणि चंद्रग्रहणाच्या दिवशी तुम्ही विष्णु सहस्त्रनामचा पाठ करावा. पूजेवर लक्ष केंद्रित करावे पण मंदिरात जाऊ नये.


पचन प्रक्रियेवर परिणाम होतो


ग्रहणाचा परिणाम आपल्या पचनसंस्थेवरही होतो. यामुळेच ग्रहण काळात अन्न खाण्यास मनाई आहे. कारण ग्रहणाच्या दुष्परिणामांमुळे अन्न आणि पाणी दूषित होते. असे अन्न खाल्ल्याने पचनास त्रास होऊ शकतो.


चंद्रग्रहण काळात ही काळजी घ्या