Gufi Paintal Death reason: महाभारतात (Mahabharat) शकुनी मामा (Shakuni MaMa) ही भूमिका अजरामर करणारे जेष्ठ अभिनेते गुफी पेंटल (Gufi Pental) यांचे ५ जून रोजी निधन झाले. बी. आर चोप्रा (B.R.Chopra) यांच्या महाभारतात पेंटल यांनी साकारलेला शकुनी मामा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्याकाळी लोकप्रियतेच्या शिखरावर असलेले गुफी पेंटल यांनी महाभारतातनंतरही अनेक मालिकांमध्ये व चित्रपटांमध्ये भूमिका साकारली. सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. झोपेतच त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती त्यांचे पुतणे हितेन पेंटल यांनी दिली आहे. (Mahabharats Shakuni Mama Death Reason)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुफी पेंटल यांचे वय ७८ होते. ते बऱ्याच कालावधीपासून आजारी होते. ३१ मे रोजी त्यांची तब्येत अधिक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. सुरुवातीला त्यांना हृदयविकाराचा आजार होता आणि नंतर किडनीचा त्रास झाला. गुफी पेंटल यांचा हृदयक्रिया बंद पडल्याने मृत्यू झाला आहे. हृदयविकार आणि किडनीच्या आजाराची लक्षणे वेळीच जाणून घेणे गरजेचे आहे. 


हृदयविकार आणि किडनीचे आजार हळूहळू बळावतात जातात. या आजारांचे लक्षण सुरुवातीला अत्यंत सौम्य असतात त्यामुळं अनेकजण दुर्लक्ष करतात. मात्र ही चूक तुमच्या जीवावर बेतू शकते. जाणून घेऊया किडनी आणि हृदयविकाराचे खतरनाक लक्षणांबाबत 


आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हृदयविकाराची लक्षणे सुरुवातीला सौम्य असतात मात्र हळूहळू वाढत जातात. त्यामुळं हृदयरोगाचा झटका येऊ शकतो किंवा हृदयक्रिया बंद पडू शकते. 


हृदयविकाराची लक्षणे कोणती


छातीत दुखणे


मान किंवा कंबरेच्यावरील भागात वेदना


अपचन


छातीत जळजळ होणे


मळमळ किंवा उलटी


थकवा जाणवणे


चक्कर येणे


दम लागणे


हृदयाचे ठोके कमी जास्त होणे


पायांना सूज येणे 


किडनीच्या आजाराची सौम्य लक्षणे कोणती


वजन कमी होणे


भूक कमी लगणे


पायाचा घोटा, हात आणि पायाला सूज येणे


दम लागणे


थकवा येणे


लघवीतून रक्त येणे


झोप न येणे


त्वचेवर सतत खाज येणे


मसल्स क्रॅम्प


डोकेदुखी


उपाय जाणून घ्या 


हृदयरोगापासून किंवा किडनीच्या आजारांपासून वाचण्यासाठी काही पथ्ये आत्तापासूनच पाळावीत रोज व्यायाम, योगा किंवा जिमला जाण्याची सवय ठेवा. ताजी फळे आणि भाज्या खा, जंक आणि प्रोसेस्ड फूड खाणे टाळा, स्मोकिंग करणे टाळा, दारु पिण्याची सवय धोकादायक ठरु शकते, प्रत्येक वर्षी नियमित सर्व चाचण्या करुन घ्या.