Side Effects Of Having Sesame Seeds : मकर संक्रांतीला तिळाचे लाडू आणि हलवा दिला जातो. शरीराला तिळाचे असंख्य फायदे आहेत. पण याचे अतिसेवन शरीरासाठी खूप घातक ठरते. त्यामुळे संक्रांतीला लाडू खाण्यापूर्वी हे नक्की वाचा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तीळ शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. हिवाळ्यात बहुतेकांना ते खायला आवडते. तीळ शरीराला उबदार ठेवण्यासोबतच हाडे मजबूत करतात. पण तुम्हाला माहित आहे का की, तीळ खाण्याचे फायदे सोबतच तोटे देखील आहेत. तीळ खाल्ल्याने जुलाब होतो आणि वजन झपाट्याने वाढते. जे लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी तीळ खाणे टाळावे. तिळामुळे पोटाची चरबीही वाढते. गर्भवती महिलांनीही तीळ खाणे टाळावे. त्यामुळे मकर संक्रांतीला तिळाच्या लाडवावर ताव मारण्याऐवजी हे जाणून घ्या. 


वजन वेगाने वाढते


तीळाच्या नियमित सेवनाने वजन झपाट्याने वाढते. तिळाच्या बियांमध्ये मुबलक प्रमाणात फॅट आणि कॅलरीज असतात, ज्यामुळे वजन झपाट्याने वाढते. तिळाच्या अतिसेवनामुळे पोटाची चरबीही झपाट्याने वाढते. जर तुम्ही बराच काळ वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर तिळाचे सेवन टाळा.


(हे पण वाचा - Makar Sankranti Wishes : मकर संक्रांतीला तिळगुळासोबतच द्या गोड शुभेच्छा)


अतिसार


तिळाचा स्वभाव उष्ण असतो. अशा स्थितीत तीळ जास्त खाल्ल्याने जुलाब होऊ शकतात. तीळ अनेकांना शोभत नाही. ज्या लोकांची पचनक्रिया मजबूत नसते. त्यांनी तीळाचे सेवन टाळावे. तीळ खाल्ल्याने डायरियाची समस्या वाढू शकते.


खाज येणे 


जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर तीळ खाणे टाळा. कारण तिळामुळे त्वचेवर ऍलर्जीची समस्या वाढू शकते. जास्त प्रमाणात तीळ खाल्ल्याने रॅशेस, लालसरपणा आणि खाज येण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. तीळ खाण्याआधी त्याची थोडी चव जरूर घ्या.


Read More