Makar Sankranti Wishes : मकर संक्रांतीला तिळगुळासोबतच द्या गोड शुभेच्छा

Makar Sankranti  Quotes in Marathi : मकर संक्रांत हा नव्या वर्षातील पहिला सण.. नवीन वर्ष पहिला सण असा या सणाचा खास उत्साह असतो. या सणाला आपल्या जवळच्या आणि खास व्यक्तीला द्या मराठीतून खास शुभेच्छा. 

| Jan 13, 2024, 21:36 PM IST

Makar Sankranti Wishes in Marathi : नवीन वर्षातला आणि पौष महिन्यातला सगळ्यात महत्त्वाचा सण मकर संक्रांती. या सणानिमित्त अनेक ठिकाणी आपल्याला पतंग, मांजा, तीळाचे लाडू, पुरण पोळी व इतर अनेक गोष्टी पाहायला आणि चाखायला मिळतात. यंदा मकर संक्रांतीचा हा सण 15 जानेवारीला साजरा केला जाणार आहे. भारतातील प्रत्येक राज्यात या सणाला विविध नावाने साजरा केला जातो. आनंद आणि समृद्धीचे प्रतीक असलेला मकर संक्रांती हा सण सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा साजरा केला जातो. यादिनानिमित्त तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप (WhatsApp) स्टेटसला मकर संक्रांतीनिमित्त सुंदर स्टेटस ठेवू शकता आणि तुमचे मित्रमंडळी आणि नातेवाईकांनाही पाठवू शकता.

1/9

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

Makar Sankranti 2024 Wishes Quotes in Marathi

जपू तिळाप्रमाणे स्नेह वाढवू गुळाप्रमाणे गोडवा ,  निर्माण करू भेद-भाव मुक्त समाज प्रेरणा ,  मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!  तिळगूळ घ्या, गोड-गोड बोला…  

2/9

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

Makar Sankranti 2024 Wishes Quotes in Marathi

तिळात मिसळला गुळ,  त्याचा केला लाडु…  मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु..! संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

3/9

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

Makar Sankranti 2024 Wishes Quotes in Marathi

आठवण सुर्याची, साठवण स्नेहाची,  कणभर तीळ, मणभर प्रेम,  गुळाचा गोडवा, ऋणानुबंध वाढवा तिळगुळ घ्या..  गोड गोड बोला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

4/9

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

Makar Sankranti 2024 Wishes Quotes in Marathi

पतंगांच्या रंगाप्रमाणेच  सकारात्मकता येऊ दे  आपल्या संसारात  उत्तरायण ठरु दे  आपल्या संसारासाठी खास 

5/9

Makar Sankranti 2024 Wishes Quotes in Marathi

तिळगुळाचा गोडवा आकाशात पतंगांची भरारी आपल्या आयुष्यात येवो मकर संक्रांतीच्या दिवशी अप्रतिम झळाळी

6/9

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

Makar Sankranti 2024 Wishes Quotes in Marathi

मांजा, चक्री, पतंगीची काटाकाटी, हलवा, तिळगुळ, गुळपोळी, संक्रांतीची लज्जत न्यारी. पतंग उडवायला चला रे मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

7/9

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

Makar Sankranti 2024 Wishes Quotes in Marathi

"काळ्या साडीवर हलव्याचे दागिने खास आपली नाती जपू हा ठेवा ध्यास, पूजा करूया नी रचूया सुगडाची रास एकमेकांवर ठेऊनी विश्वास, तिळगुळ घ्या गोड गोड बोला

8/9

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

Makar Sankranti 2024 Wishes Quotes in Marathi

साजरे करू मकर संक्रमण करून संकटांवर मात हास्याचे हलवे फुटून तिळगुळांची करू खैरात संक्रांतीच्या अनेक शुभेच्छा !

9/9

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

Makar Sankranti 2024 Wishes Quotes in Marathi

विसरुनी जा दुःख तुझे हे, मनालाही दे तू विसावा.. आयुष्याचा पतंग तुझा हा, प्रत्येक क्षणी गगनी भिडावा मकर संक्रांतीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !