Male Infertility Fact : सर्वसामान्यांमध्ये खूप मोठा गैरसमज आहे की थायरॉईडचा (Thyroid) त्रास महिलांनाच होतो. पण हा समज चुकीचा आहे. थायरॉईड त्रास पुरुषांनाही होऊ शकतो. एवढंच नाही तर तो त्यांच्यासाठी खूप जास्त त्रासदायक ठरु शकतो. जर तुमच्याकडे कोणाला पुरुषाला थायरॉईडचा त्रास असेल तर आताच सावध व्हा. कारण थायरॉईडच्या त्रासामुळे पुरुषांमधील प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. फर्टिलिटीच्या (types of male infertility)जोरावरच जोडप्यांना आई वडील होण्याची भाग्य लाभतं. निरोगी शुक्राणूंचा विकास आणि उत्पादन सुलभ करण्यासाठी पुनरुत्पादक हार्मोन्सचं योग्य संतुलन राखणं महत्वाचं आहे. त्यामुळे जर तुम्ही आताच काही काळजी घेतल्यास तुम्हाला त्रास जाणवणार नाही.  (Male infertility Thyroid Symptoms in Men know how to cope it sscmp symptoms and remedie marathi news)


पुरुषांना होणारे थायरॉईडचे प्रकार किती आहेत? 


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    हायपोथायरॉईडीझम

  • ऑटोइम्यून हायपोथायरॉईडीझम

  • ऑटोइम्यून हायपरथायरॉईडीझम 


पुरुषांमध्ये दिसणारे थायरॉईडची लक्षणं 


  • वजन वाढणे वा कमी होणे

  • केस गळणे

  • खूप जास्त थकवा निर्माण होणे

  • डिप्रेशन

  • झोप न येणे

  • कमी सेक्स ड्राइव्ह

  • कमी शुक्राणूंची संख्या

  • नपुंसकता

  • स्नायू कमी होणे

  • कमी टेस्टोस्टेरॉन पातळी

  • gynecomastia (पुरुषांच्या स्तनांची वाढ)


 
पुरुष प्रजनन समस्या होऊ नये म्हणून हे करा!


  • योग्य आहार : लीन मीट, भाज्या, शेंगा आणि धान्ये असा आहार घेतल्यास शुक्राणूंची गतिशीलता वाढण्यास मदत होते. 

  • हेल्दी वजन : पुरुषांनी कायम हेल्दी वजन राखले पाहिजे. कारण जास्त वजनामुळे पुरुष वंध्यत्वाची समस्या जाणवू शकते. 

  • शारीरिक क्रियाकलाप : नियमित व्यायामामुळे शुक्राणूंची गुणवत्ता टिकवून ठेवण्यास आणि तणाव कमी करण्यास मदत होते. 



(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)